राजापूर : झाड कोसळून शिवणे बुद्रुक जिल्हा परिषद शाळेचे नुकसान; तातडीने निधी मंजूर

Jul 25, 2024 - 10:52
Jul 25, 2024 - 13:55
 0
राजापूर : झाड कोसळून शिवणे बुद्रुक जिल्हा परिषद शाळेचे नुकसान; तातडीने निधी मंजूर

राजापूर : राजापूर तालुक्यातील शिवणे बुद्रुक गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मोठे झाड कोसळून यामधील दोन वर्ग खोल्या आणि शौचालय यांचे नुकसान झाले होते. ही घटना समजताच सिंधुरत्न समृद्ध योजनेचे सदस्य किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली अपूर्वा किरण सामंत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या वर्ग खोल्यांसाठी पालकमंत्री सामंत यांनी तातडीने निधी मंजूर केला आहे.

मंगळवारी दोन वर्गखोल्यांवर धोकादायक असलेले झाड कोसळून वर्गखोल्यांचे नुकसान झाले. ही घटनाच समजताच अपूर्वा किरण सामंत यांनी शिवणे बुद्रुक येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जाऊन घडलेल्या घटनेची पाहणी केली. यावेळी बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आयरेकर आणि गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले हे देखील उपस्थित होते. यावेळी तालुका संघटक भरत लाड, विभाग प्रमुख व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
 
त्याचप्रमाणे शिवसेना तालुका प्रमुख दीपक नागले यांनी देखील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या समवेत जाऊन शिवणे बुद्रुक शाळेची पाहणी केली. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दीपक नागले यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी संवाद साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती करून दिली. सामंत यांनी वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी तात्काळ निधी मंजूर करण्यात येत असल्याची माहिती दिली. तसे प्रस्ताव तातडीने आमच्याकडे पाठवा, असे आदेशही दिले. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख चंद्रकांत जानस्कर, विभागप्रमुख मनिष लिंगायत, युवासेना उपविभाग प्रमुख गणेश लाड, वडवली शाखाप्रमुख विठ्ठल शेलार, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रणित आमटे, केंद्रप्रमुख पंडित, मुख्याध्यापक प्रकाश बाईत, ग्रामसेवक पवार, सरपंच भोसले, उपसरपंच जाधव आदी उपस्थित होते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:20 PM 25/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow