ना. उदय सामंतांच्या प्रयत्नांना यश; क्रूझ टर्मिनल च्या ३०२ कोटीच्या अंदाजपत्रकाला मान्यता

Aug 24, 2024 - 10:50
 0
ना. उदय सामंतांच्या प्रयत्नांना यश; क्रूझ टर्मिनल च्या ३०२ कोटीच्या अंदाजपत्रकाला मान्यता

◼️ रत्नागिरीच्या पर्यटनासाठी क्रांतिकारी निर्णय

◼️ रत्नागिरी-गोवा-मुंबई जलवाहतुकीचे स्वप्न पूर्ण होणार

◼️ रत्नागिरीतील भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनलला अखेर मंजूरी

रत्नागिरी : शहरातील भगवती बंदर येथे कुझ टर्मिनलला अखेर मंजूरी मिळाली आहे. तसा अध्यादेश शासनाने शुक्रवारी जारी केला. यामध्ये ३०२ कोटी ४२ लाख १० हजार रक्कमेचे अंदाजपत्र तयार करण्यात आले आहे. लवकरच मुंबई ते गोवा या जल मार्गावर जलेश व आंग्रीया ह्या क्रुझला थांबा मिळणार आहे.

त्यामुळे पर्यटकांना कोकणातीलल निसर्गसौंदर्य आणि पर्यटनस्थळांचा आनंद लुटता येणार आहे. उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी या क्रुझ टर्मिनलसाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे. भगवती बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून साधारण १९ कि.मी. अंतरावर भगवती बंदर आहे. जवळच विमानतळ देखील आहे. सद्यस्थितीत मुंबई ते गोवा अशी फेरी सेवा जलेश व आंग्रीया ह्या कुझव्दारे सुरु आहे. मुंबई ते गोवा जलमार्गावर महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीमध्ये कोठेही थांबा नाही. त्यामुळे पर्यटकांना रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील पर्यटनस्थळे पाहता येत नाहीत.

रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी पर्यटनस्थळे ही भगवती बंदराच्या आसपास आहेत. त्यामुळे भगवती बंदर येथे सुसज्ज असे क्रुझ टर्मिनल विकसीत केल्यास पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल. परीणामी स्थानिकांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होईल. त्यानुसार भगवती बंदर येथे क्रुझ टर्मिनल विकसीत करण्यासंदर्भात महाराष्ट्र सागरी मंडळांनी शासनास प्रस्ताव सादर केला आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या प्रस्तावानुसार २०२२- २३ च्या प्रस्तावाला शासनाने मंजूरी दिली आहे. यामध्ये ३०२ कोटी ४२ लाख १० हजार १७१ इतक्या रक्कमेचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 24-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow