खेड : 'उबाठा' शिवसेनेककडून पूरग्रस्तांसाठी ९ ऑगस्टला आंदोलनचा इशारा

Jul 25, 2024 - 11:07
Jul 25, 2024 - 14:10
 0
खेड : 'उबाठा' शिवसेनेककडून  पूरग्रस्तांसाठी ९ ऑगस्टला आंदोलनचा  इशारा

खेड : शहरामध्ये या वर्षी उ‌द्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे नागरिकांचे, व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. तसेच मागील वर्षी झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले परंतु अद्याप बहुतांशी व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. या सर्व पूरग्रस्तांना लवकरात लवकर नुकसान भरपाई न मिळाल्यास ९ ऑगस्ट रोजी तीनबत्ती नाका येथे आंदोलन करण्याचा इशारा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून १९ रोजी खेड तहसीलदार यांच्यामार्फत सरकारला निवेदन देऊन देण्यात आला आहे.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आल्यानुसार, खेड नगर पालिका हद्दीत दरवर्षी पुराच्या पाण्याने नागरिकांचे व व्यापारांचे अतोनात नुकसान होते. खेड जगबुडी नदीतील गाळ काढण्यात होत असणारी दिरंगाई यामुळे होत असणारा त्रास, शासनाचे दुर्लक्ष तसेच गतवर्षीची मदत पंचनामे होऊन देखील अद्याप मिळालेली नाही. तसेच विमा कंपनीकडून कमाल पुररेषा पातळीची जाचक अट त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास व शासनाचे दुर्लक्ष त्यामुळे नागरिकांच्या मनात प्रचंड राग आहे. मागिल काही वर्षांची मिळणारी पुरग्रस्तांना नुकसानीची मदत अद्याप मिळालेली नाही, जर ही नुकसानीची रक्कम पूरग्रस्तांना लवकरात लवकर न मिळाल्यास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने ९ ऑगस्ट २०२४ रोजी तीनबत्ती नाका येथे उग्र आंदोलन छेडण्यात येईल. 

आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस शासन जबाबदार राहील, असे नमूद करण्यात आले आहे. हे निवेदन देताना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार संजय कदम, शिवसेना तालुकाप्रमुख संदीप कांबळे, शिवसेना शहरप्रमुख दर्शन महाजन, शिवसेना विभाग प्रमुख अंकुश कदम, विभाग प्रमुख विश्वास कदम, दत्ता भिलारे, युवा सेना जिल्हा सचिव राकेश सागवेकर, अनिल विचारे, वैभव खानविलकर, विनायक खानविलकर, रमेश माने, सुभाष सुर्वे, संजय खानविलकर, संदीप सावंत, सिद्धेश विचारे, शुभम विचारे, लक्ष्मण घुमक, शांताराम महागावकर, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना, शिवसेना अंगीकृत संघटना, पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:33 PM 25/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow