लांजा-राजापूर विधानसभा गटात किरण सामंत सुसाट..!

Sep 14, 2024 - 17:04
 0
लांजा-राजापूर विधानसभा गटात किरण सामंत सुसाट..!

◼️ लांजा-राजापूर दोन्ही तालुक्यात तब्बल ४२७ घरगुती आणि सार्वजनिक गणपतीचे किरण सामंत यांनी घेतले दर्शन

रत्नागिरी : लांजा -राजापूर मतदार संघातील तब्बल ४२७ सार्वजनिक आणि घरगुती गणपतीला किरण सामंत यांनी घरा घरात जाऊन दर्शन घेतले. किरण सामंत सारख्या माणसाचे पाय आमच्या घराला लागले हें आमचे भाग्य असल्याचे येथील कार्यकर्त्यांनी सांगितले.    

कोकणात गणेशउत्सवाची मोठी धामधूम सुरु असून प्रत्येक राजकीय पक्ष आपल्याला आपल्या पद्धतीने काम करत आहेत. मात्र लांजा -राजापूर विधानसभा मतदार संघात किरण सामंत हें जनतेच्या मनातील घरा घरातील व्यक्तीमत्व आहे. हें व्यक्ती महत्व यावेळी तब्बल ४२७ गणरायाला कार्यकर्त्यांच्या घरात जाऊन आशीर्वाद घेतला. किरण सामंत हें कोकणातील वेगळे व्यक्तिमत्व आहे. आज त्यांच्याकडे विकासाचा मासीहा म्हणून पाहिले जात आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या खांद्याला खांदा लावून किरण सामंत यांनी रत्नागिरी तालुका आणि शहरात विकासाच्या माध्यमातून कायापालत करून रत्नागिरी शहर पर्यटनच्या दृष्टीने पुढे नेण्याचे काम केले. तोच विकासास लांजा-राजापूर मधून करून लांजा-राजापूर वासियांची सेवा करण्याचे सामर्थ गणरायाकडे मांगितले असल्याचे किरण सामंत यांनी यावेळी सांगितले ते पुढे म्हणाले,लांजा-राजापूर वासियांच्या स्वप्नांपलीकडील विकासाला चालणा देण्याचे काम करून गेल्या १५ वर्षाचा बॅक लॉक येत्या ५ वर्षात भरून काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. गणपती सणाच्या शुभ काळात गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेली राजापूर शहराची २९. ९७ कोटीची नळपाणी योजना मंजुर करण्यात गणरायाने यश दिले आणि मला खात्री नाही पूर्ण विश्वास आहे लांजा-राजापूर सर्व जाती-धर्माची मधील समस्त जनता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांची सेवा करण्यासाठी सक्षम आमदार म्हणून त्यांच्या विकासाला चालणा देण्यासाठी मला विधान भवनात पाठवणार आहे.
        
लांजा-राजापूर मधील ग्रामीण भागातील शेतकरी-मजूर-गरीब जनतेची ज्यावेळी मुल त्यांच्या अंगणवाडी आणि शाळेत चांगल्या दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी मी येथील शाळा आणि अंगणवाडी स्मार्ट बनवत आहे. तर आरोग्याच्या सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम पण सुरु केले आहे मी आमदार होईन की नाही हें येथील जनता ठरणार आहे मात्र येथील जनतेची सेवा मी करणार असल्याची शपथ घेतल्याचे किरण सामंत म्हणाले.त्यांच्या या गाठी भेटीच्या कार्यक्रमा मुळे येथील कार्यकर्त्यांमध्ये वेगळे चैतन्य निर्माण झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:33 14-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow