कोयना प्रकल्प अलोरे संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन
चिपळूण : महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय व कंत्राटी कामगार संघ शाखा कोयना प्रकल्प अलोरे या संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते तथा वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेनेचे (उबाठा) तालुकाप्रमुख विनोद झगडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष जनार्दन पवार, सहसचिव संजय डेरवणकर, कामगार संघांचे कोयना प्रकल्प अध्यक्ष रमेश सुतार, शाखाध्यक्ष अनिल शिंदे, सचिव अक्षय जाधव, खजिनदार किरण धापसे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:12 PM 26/Jul/2024
What's Your Reaction?