मुंबई-गोवा महामार्गाची आरवली, सावर्डे येथे रस्त्याची चाळण

Jul 26, 2024 - 12:36
 0
मुंबई-गोवा महामार्गाची आरवली, सावर्डे येथे रस्त्याची चाळण

माखजन : मुंबई-गोवा महामार्गावर आरवली व सावर्डे येथे रस्त्याची चाळण झाली आहे. याचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहेत. आरवली येथे असलेल्या सर्व्हिस रोडवर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. सर्वत्र खड्डे पडले असून, यातून वाहन चालकांना मार्ग काढताना अवघड जात आहे. खड्ड्यामध्ये चिखल पाणी साचल्याने खड्यांची खोली लक्षात येत नसल्याने वाहने आपटण्याचे प्रमाण वाढले आहे. चिखलात घसरुन दुचाकीस्वार पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

सावर्डेनजीक आगवे येथे मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर खड्यामुळे गाड्या कलंडण्याचे रोज प्रकार समोर येत असताना, संबंधित ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

आरवली येथे उड्डाणपुलाच्या बाजूला सर्व्हिस रोडवर व आगवे येथे मुख्य रस्त्यावर नवीन खड्डा पडायला जागा शिल्लक नसल्याचे वास्तव आहे. मुंबई गोवा महामार्ग म्हणजे प्रवासी व वाहन चालकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप प्रवासी वर्गातून होत आहे. या स्स्त्यांची तत्काळ दुरुस्ती व्हावी, अशी मागणी केली जात आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:03 PM 26/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow