चिपळूण : परशुराम घाटात चौपदरीकरणात नव्याने केलेले डोंगर कटाई धोकादायक

May 31, 2024 - 15:47
 0
चिपळूण :  परशुराम घाटात चौपदरीकरणात नव्याने केलेले डोंगर कटाई धोकादायक

 चिपळूण : यंदाच्या पावसाळ्यात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही अंशी निर्धोक झाली आहे. कारण महामार्गावरील घाटांची स्थिती 'ओके' असून, फक्त पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे 'धोके' आहेत.


मुंबई-गोवा महामार्गाचे काम जूनपर्यंत पूर्ण होईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली असली, तरी या कालावधीत चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास जाणे अवघड आहे. निदान पावसाळ्यात महामार्गावरील घाटांची स्थिती चांगली असून, यावर्षी कशेडी घाटाला पर्याय म्हणून कशेडीचा एक बोगदा दुहेरी वाहतुकीसाठी (छोट्या वाहनांना) खुला करण्यात आला आहे. त्यामुळे कशेडी घाटातील धोका कमी झाला आहे.


मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील घाटरस्त्यांची कामे बहुतांश मार्गी लागत असून, फक्त नव्याने कटाई करण्यात आलेल्या डोंगरांमुळे दरडींचे धोके आहेत. गतवर्षी खेडमधील भोस्ते घाटाचे काम पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे या घाटात वाहतुकीस अडथळा नाही. शिवाय दरडी कोसळण्याचा धोका नाही. फक्त भोस्ते घाटातील अवघड वळणावर अपघात होत आहेत. यानंतर परशुराम घाटातील चौपदरीकरण रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे यावर्षी परशुराम घाट वाहन चालकांसाठी निर्धोक आहे; मात्र रस्त्याच्या कडेला मोठी खोदाई झाली आहे. अतिवृष्टीमध्ये पहिली दोन-तीन वर्षे एका लेनवर दरड कोसळण्याचा धोका आहे. परंतु परशुराम घाट वाहतुकीसाठी दोन्ही लेननी पूर्णत्वास गेला आहे. त्यामुळे मोठा धोका टळला आहे.

याच दरम्यान कामधे घाटातील सुरळीत होणार आहे चौपदरीकरणाचे कामदेखील पूर्णत्वास गेले असून, या ठिकाणची वाहतूक निर्धोक झाली आहे. दरवर्षी कामथे व परशुराम घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प होत होती. त्यामुळे वर्षानुवर्षांचा प्रश्न निकालात निघाला आहे. कामथे घााटातही दरडी कोसळण्याचा धोका काहीसा संभवत आहे. मात्र, हा घाट वाहतुकीसाठी निर्धोक झाला आहे. त्या शिवाय असुर्डे घाटातदेखील चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. बावनदीमधील निवळी घाटाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, या ठिकाणी दरडी कोसळण्याचा फारसा धोका नाही.

परशुराम घाटात चोवीस तास यंत्रणा सज्ज राहणार...
घाटातील दरडींचा धोका लक्षात घेऊन येथील प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी आपत्कालीन व्यवस्थापनाच्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार कंपनीला सूचना दिल्या आहेत. दरडींचा धोका असलेल्या ठिकाणी चोवीस तास गस्त ठेवावी, रात्रीच्यावेळी या ठिकाणी पहारा ठेवून लाईटची व्यवस्था करावी. तसेच घाटरस्त्याच्या ठिकाणी जेसीबी, पोकलेन, डम्पर चोवीस तास तैनात ठेवावा, अशा सूचना दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:16 PM 31/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow