गुहागरात मुसळधार पावसाने १ लाख ६६ हजारांचे नुकसान

Jul 29, 2024 - 12:00
Jul 29, 2024 - 12:14
 0
गुहागरात मुसळधार पावसाने १ लाख ६६ हजारांचे नुकसान

गुहागर : गुहागर तालुक्याला गेल्या दोन दिवस पावसाने झोडपून काढले आहे. घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे दि. २५ आणि २६ या दोन दिवसांमध्ये १ लाख ६६ हजार ८०० रुपये नुकसान झाले आहे.

मुंढर, गुहागर येथे अतिवृष्टीने झाड पडून सखाराम यशवंत गावडे घराचे अंशतः नुकसान रू. ३२००/- दत्ताराम यशवंत गावडे घराचे अंशतः नुकसान रू. १६००/- मौजे साखरी त्रिशुळ गवळवाडी येथील गजानन दत्ताराम कासार घरासमोर संरक्षण भिंतीवर झाड पडून संरक्षण भिंतीचे कठडा भिंती चे अंदाजे १५००० रुपयांचे नुकसान न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे, शृंगारतळी येथे शाळेचे पत्रे उडून अंदाजे ५००० हजार रुपयांचे नुकसान झाले. ग्रामपंचायत कौंढर काळसरमधील यशवंत जोयशी यांच्या मालकीच्या गोठ्याची भिंत कोसळली आहे. यात अंदाजे १००० ते १५०० नुकसान पाटपन्हाळे (सावंतवाडी), तालुका गुहागर येथील दीपक चव्हाण यांच्या गोठ्याची भिंत पडून साधारण ४५०० रुपये नुकसान झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 29/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow