कोकण रिजन कला प्रदर्शनासाठी सावर्डे, देवरुखच्या विद्यार्थ्यांची निवड

Aug 8, 2024 - 12:34
Aug 8, 2024 - 16:51
 0
कोकण रिजन कला प्रदर्शनासाठी सावर्डे, देवरुखच्या विद्यार्थ्यांची निवड

चिपळूण : प्रभादेवी (मुंबई) येथे होणाऱ्या कोकण रिजन कला प्रदर्शनात सह्याद्री स्कूल ऑफ आर्टस् व देवरूखमधील डी-कॅड कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन दि. १० ऑगस्ट रोजी होणार असून, हे प्रदर्शन दि. १८ पर्यंत सकाळी ११ ते ७ पर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे.

कोकणचे ज्येष्ठ चित्रकार - शिल्पकार व कला महाविद्यालयाचे चेरमन प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के अनेक होतकरू कला विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट पेंटिंग विभागातील पाच या विद्यार्थ्यांची कला प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. 

ईशा राजेशिर्के, सायली कदम, मयुरी सावंत, राज वरेकर, करण आदवडे यांच्या २५ चित्रांची तसेच देवरुख कला महाविद्यालयातील आर्या कामत, प्रियांशु मिठागरी, टेंझीन ओल्डन यांच्या १३ चित्रांची निवड झाली आहे.  या चित्रांतून कोकणातील प्रादेशिक विविधतेने नटलेले सौंदर्य जलरंग, अक्रेलिक, तैलरंग, रंगीत खडू या माध्यमातून चितारण्याचा प्रयत्न केला आहे.

सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आ. शेखर निकम, अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश महाडिक, जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रा. प्रकाश राजेशिर्के, माजी सभापती पूजा निकम, स्कूल कमिटी सदस्य, प्राचार्य माणिक यादव आदींनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:01 PM 08/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow