कोकण मत्स्य व्यवसाय उपायुक्तपदी नागनाथ भादुले यांची नियुक्ती

Jul 30, 2024 - 10:28
Jul 30, 2024 - 10:37
 0
कोकण मत्स्य व्यवसाय उपायुक्तपदी नागनाथ भादुले यांची नियुक्ती

रत्नागिरी : पदोन्नतीने रत्नागिरीतून संभाजीनगर येथे मत्स्य व्यवसाय उपप्रादेशिक उपायुक्त म्हणून बदली होवून गेलेल्या नागनाथ भादुले यांची कोकण उपप्रादेशिक उपायुक्त म्हणून नियुक्त झाली आहे. कोकणातील ७ जिल्ह्यांमधील भूजल मत्स्य व्यवसाय उपायुक्त म्हणून सोमवारी कार्यभार स्वीकारला.

सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त म्हणून नागनाथ भादुले यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा कार्यभार सांभाळला. येथील अडीच वर्षांच्या कालावधी संपल्यानंतर त्यांची पदोन्नतीने संभाजीनगर येथे भूजल उपप्रादेशिक उपायुक्त म्हणून बदली झाली. संभाजीनगरातील सुमारे २ वर्षांच्या कालावधीनंतर आता कोकण उपायुक्त पदावर आहे. बदली झाली मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांमधील भूजल मत्स्यव्यवसायला चालना मिळणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 30/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow