खेड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी महादेव रोडगे यांची निवड

Jul 13, 2024 - 12:13
 0
खेड  नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी महादेव रोडगे यांची निवड

खेड : खेड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी महादेव रोडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. रोडगे हे ठाणे महानगरपालिकेत उपायुक्त पदावर कार्यरत होते. यापूर्वी श्री. रोडगे यांनी गुहागर, खेड व महाड येथे मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

नागरिकांशी अत्यंत सलोख्याचे त्यांचे वागणे असते. नगरपालिकेतील अनेक कामे त्यांनी पुढाकार घेऊन केली आहेत. नागरिकांच्या विविध प्रश्नांवर ते कृतिशील असतात. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. खेडमध्ये यापूर्वी त्यांनी अत्यंत चांगले काम केले आहे. त्यामुळे खेड नगर पालिकेला आता कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाले आहेत.

गेले दोन वर्षे खेडला कायम मुख्याधिकारी पद नव्हते. प्रभारी मुख्याधिकारी म्हणून बाहेरून मुख्याधिकारी येत असत. आता हा प्रश्न कायमचा सुटला आहे. त्यामुळे खेड न.प. कर्मचारी आणि शहरातील नागरिक यांनी त्यांचे स्वागत केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 PM 13/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow