Paris Olympics 2024: मनू भाकर आणि सरबज्योत सिंग जोडीला कांस्य पदक, १० मीटर एअर पिस्टल मिश्र दुहेरीत भारताला कांस्य

Jul 30, 2024 - 13:40
 0
Paris Olympics 2024: मनू भाकर आणि सरबज्योत सिंग जोडीला कांस्य पदक, १० मीटर एअर पिस्टल मिश्र दुहेरीत भारताला कांस्य

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024)मनू भाकर (Manu Bhaker) आणि सरबज्योतसिंग यांच्या जोडीने इतिहास रचला आहे. 10 मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात भारताने कांस्य पदक जिंकलं आहे.

तसेच एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी मनू भाकर पहिली आणि एकमेव भारतीय खेळाडू ठरली आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने दुसरे पदक जिंकले आहे. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी दक्षिण कोरियाच्या ली वोंहो आणि ओ ये जिन या जोडीचा 16-10 असा पराभव करून कांस्यपदक जिंकले. 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला हे पदक मिळाले आहे. मनू भाकरचे हे दुसरे ऑलिम्पिक पदक आहे.

भारताची पाच फेरीत आघाडी-

पहिली फेरी-
भारत- 18.8
दक्षिण कोरिया-20.5

दुसरी फेरी-
भारत-21.2
दक्षिण कोरिया- 19.9

तिसरी फेरी-
भारत- 20.8
दक्षिण कोरिया- 19.8

चौथी फेरी-
भारत- 20.7
दक्षिण कोरिया- 20.5

पाचवी फेरी-
भारत- 20.1
दक्षिण कोरिया- 19.5

सहावी फेरी-
भारत- 20.2
दक्षिण कोरिया-20.6

वैयक्तिक 10 मीटर एअर पिस्टलमध्येही मनू भाकरचं कांस्य पदक

पॅरीस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत (Paris Olympics 2024) भारताच्या मनू भाकरने (Manu Bhaker)महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला हे पहिलं कांस्यपदक मिळालं आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज ठरली होती.

कोण आहे मनू भाकर?

22 वर्षांची मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे. जागतिक नेमबाजीत मनू भाकरनं आतापर्यंत दोन सांघिक पदकं मिळवलेली आहेत. तर नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेलं आहे. 2022 साली मनू भाकरला एशियाडचं एक सांघिक सुवर्णपदक मिळालं होतं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:08 30-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow