गुहागर : वडद येथील गंजलेल्या विद्युत खांब धोकादायक
गुहागर : तालुक्यातील वडद ग्रामपंचायत क्षेत्रातील विजेचे बहुतांश खांब गंजलेल्या अवस्थेत आहेत. रामचंद्र गावणंग यांच्या घराजवळील विजेचा खांब तर पूर्णतः वाकला आहे. त्यामुळे गंभीर दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे. महावितरणच्या गुहागर आणि तळवली कार्यालयाला सतत तीन वर्षे पत्र व्यवहार करूनसुद्धा त्याला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. गंजलेले हे पोल तत्काळ बदलावेत, अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 31/Jul/2024
What's Your Reaction?