रत्नागिरी : 'अभ्यंकर-कुलकर्णी' कनिष्ठ महाविद्यालयात महिला विकास कक्ष

Jul 31, 2024 - 12:26
Jul 31, 2024 - 14:43
 0
रत्नागिरी : 'अभ्यंकर-कुलकर्णी'  कनिष्ठ महाविद्यालयात महिला विकास कक्ष

रत्नागिरी : शहरातील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात महिला कक्षाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

यावेळी उपप्राचार्य सुनील गोसावी यांनी 'नेतृत्वगुण आणि नेतृत्वगुणाचा विकास' या विषयावर मार्गदर्शन केले. वाणिज्य विभागप्रमुख प्रा. शिल्पा तारगावकर यांनी 'मुलींची वर्तणूक, वेशभूषा, सामाजिक माध्यमे' याविषयी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. अपर्णा तगारे यांनी केले. यावेळी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:51 PM 31/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow