दापोली : जालगावमध्ये घराला आग लागून दीड लाखांचे नुकसान

Aug 27, 2024 - 10:42
Aug 27, 2024 - 10:44
 0
दापोली : जालगावमध्ये घराला आग लागून  दीड लाखांचे नुकसान

दापोली : जालगाव येथील घरातील साहित्याला आग लागून दीड लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही.

जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगाव हद्दीतील कुंभारवाडी येथील रहिवासी प्रियांका प्रकाश वायकर यांच्या घराला अचानक आग लागली. आगीमुळे घराचे तसेच आतील वापराच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग विझवण्यासाठी आजूबाजूचे ग्रामस्थ तातडीने धावत आले आणि पाण्याचा जोरदार मारा करून आग विझवली. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला. घटनेमध्ये वायकर यांचे १ लाख ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सरपंच व संबंधित ग्रामपंचायत सदस्य घटनास्थळी उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांना घटनेचा पंचनामा करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी, अशा सूचना सरपंचांनी दिल्या. तसेच वायकर कुटुंबीयांना आपत्कालीन व्यवस्थापनामधून ग्रामपंचायतीतर्फे लवकरात लवकर मदत देण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही सरपंच अक्षय फाटक यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 27/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow