जि. प. पू. प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी शाळेकडून शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा

Aug 1, 2024 - 12:12
 0
जि. प. पू. प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी शाळेकडून शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा

तवसाळ : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षन परिषद पुणे, महाराष्ट्र, शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमीत्त विषय कौशल्य आणि पर्यावरण नुसार जनजागृती बाबत क्षमता विकसित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ज्यामध्ये संसाधन संवर्धन ईतर सर्व बाबी विद्यार्थ्यांना शिकवल्या पाहिजे त्या अनुसंगाने 22 जुलै ते 29 जुलै 2024 या कालावधीत जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी शाळेने या शिक्षण सप्ताहाच्या नियोजनाप्रमाणे दिलेली परिशिष्ट्ये प्रत्येक दिवसी घेवून विद्यार्थ्यांना विविध क्षमता विकसित होण्यासाठी आवश्यक असलेले उपक्रम राबविले या उपक्रमामध्ये शैक्षणिक साहित्य निर्माती करण्यात आली.

मुलांना मुलभूत संख्या ज्ञानाच्या दृष्टीने विविध गणितीय खेळ खेळले. क्रीडा दिवस म्हणून मुलांनी कबड्डी, लंगडी, बुद्भीबळ  सारखे खेल खेळले,सांस्कृतिक दिवस म्हणून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या धर्माचा पेहराव करून "सर्व धर्म समभा"' हा संदेश दिला. ऐतिहाशीक स्थळ आणि पर्यटक नेहमी भेट देत असलेल्या तवसाळ गाव पंचक्रोशी मंदिर श्री महामाई सोनसाखळी मंदिरास भेट दिली. कौशल्यावर आधारील उपक्रम म्हणून विद्यार्थ्यांनी मातीपासून माती काम करत वेगवेगळ्या वस्तु तयार केल्या. इको क्लबची स्थापना करून वृक्ष लागवड केली. समाजाचा सहभाग म्हणून समुदाय सहभाग दिवस साजरा केला.

अशा प्रकारे हा सप्ताह एकदम आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या मधिल असलेल्या कला सादर करायला संधी मिळाली. या उपक्रमाच्या एकच उद्देश होता आणि तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास कसा साध्य करता येईल यासाठी हा उपक्रम खूप महत्त्वाचा होता पार पाडण्यासाठी हा उपक्रम यशस्वीरित्या जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी शाळेचे मुख्याध्यापक - क.अंकुर मोहिते सर पदवीधर,श्री संदिप भोये सर शिक्षक,  ,श्री.गोकुळ गोविळ सर,कु.साईनाथ पुंजारा सर यांचे मनःपूर्वक आभार.

सर्व उपक्रमाचे उत्तम फोटोज रत्नागिरी जिल्ह्यातील व गुहागर तालुक्यातील एकमेव शाळा सर्व शाळेतील कार्यक्रम सोशल नेटवर्कर उपलब्ध आहेत. सोशल मीडिया प्रसार माध्यम Dj सचिन कुळये तवसाळ तांबडवाडी यांनी फेसबुक, इंन्स्टाग्रामवर अपलोड करून अनेक लोकांपर्यंत शाळेय जनजागृतीचा प्रसार केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 01-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow