रत्नागिरी : खालगाव गोताडवाडीला वादळी पावसाचा फटका

Aug 2, 2024 - 09:44
Aug 2, 2024 - 10:08
 0
रत्नागिरी : खालगाव गोताडवाडीला वादळी पावसाचा फटका

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील खालगाव शेवटची गोताडवाडी येथे गुरुवार दि. २० जून रोजी दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने खालगाव शेवटची गोताडवाडी येथील १५ शेतकऱ्यांच्या घरांवरील छप्पर, कौले तसेच ६ शेतकऱ्यांच्या गोठ्यांवरील पत्रे, कौलै उडल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे ऐन पावसात मोठे संकट ओढवल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सदर घटना गुरुवारी २० जून रोजी दुपारच्या दरम्याने घडल्याने शेतकरी व ग्रामस्थ अक्षरशः भयभीत झाले. या घटनेची माहिती मिळतात गावचे सरपंच प्रकाश खोल्ये, तलाठी कार्यालयातील कर्मचारी व गावातील सामाजिक कार्यकर्ते, तरुण मंडळी यांनी तात्काळ या शेवटच्या वाडीला भेट देऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. या शेतकऱ्यांच्या घरांच्या तसेच गोठ्यांच्या पडझडीमध्ये मोलमजुरी करणाऱ्या, हातावर पोट असलेल्या शेतकऱ्यांचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. 

जोरदार वादळी पाऊस, त्यात विजांचा कडकडाट हा भयानक प्रकार शेतकऱ्यांना अचानक अनुभवायला मिळाला. वादळी पावसामुळे ही घटना घडली आहे. या घटनेमुळे खालगाव शेवटच्या गोताडवाडीला भयंकर नैसर्गिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. येथील शेतकऱ्यांसमोर निवाऱ्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. ऐन पावसात घरांवरील छप्पर उडाल्याने एकूणच या घटनेकडे प्रशासनाने लक्ष वेधून या शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 02/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow