'नाट्य दिग्दर्शक फसवणूक प्रकरणात फडणवीसांनी अडकवलं' : मनोज जरांगे

Aug 2, 2024 - 11:59
 0
'नाट्य दिग्दर्शक फसवणूक प्रकरणात फडणवीसांनी अडकवलं' : मनोज जरांगे

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)मध्यरात्री 2 वाजता पुण्यात दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील आज पुणे न्यायालयात हजर होत आहेत. मनोज जरांगे यांच्या विरोधात पुणे न्यायलयाने वॉरंट जाहीर केलं होतं.

त्यानंतर आज जरांगे (Manoj Jarange Patil) पुण्यातील न्यायालयात हजर झाले आहेत, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी नाट्य दिग्दर्शक फसवणूक प्रकरणात मला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच अडकवले असल्याचं म्हटलं आहे.

जरांगे (Manoj Jarange Patil)बोलताना म्हणाले, "नाट्य दिग्दर्शकाचा फसवणुकीचे प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे मी त्याच्यावरती बोलणार नाही. मात्र मी न्यायालयाचा सन्मान केलेला आहे. मी आज हजर व्हायला जात आहे. शंभूराजे महानाट्य दाखवण्यात आले होते त्या नाटकाशी माझा संबंध आहे. मात्र त्या नाटकाच्या व्यवहाराची माझ्या काही संबंध नाही. शंभूराजे नाटकामध्ये तोटा झाला होता. तो आम्ही तिघांनी वाटून घेतला होता."

"ज्यावेळी हा नाटक आयोजित करण्यात आले होते. त्यावेळेस आम्ही सामान्य मुलं होतो आणि आम्ही आज देखील सामान्यचं आहोत. त्यातील एका व्यक्तीने दिग्दर्शकाला पैसे भरून देण्याचे आश्वासन दिले होते.आमच्यातला एक जण म्हणाला की, माझं आणि दिग्दर्शकाचा बरं आहे. मी त्याला पैसे देतो मात्र ते त्यांनी दिले की नाही हे मला माहित नाही, असं जरांगेंनी (Manoj Jarange Patil) यावेळी म्हटलं आहे. मी कुठे अडकत नव्हतो म्हणून मला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यामध्ये अडकवले आहे" असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

मनोज जरांगे पाटलांविरोधात (Manoj Jarange Patil) वारजे येथील धनंजय घोरपडे यांनी फिर्याद दिली होती. यामध्ये मनोज जरांगे यांच्यासह आणखी दोन जणांची नावे घेण्यात आलेली आहेत. या प्रकरणामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. त्याचबरोबर कोर्टाने मनोज जरांगे यांना दोन वेळा कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते.

त्यावेळी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil)आंदोलनामुळे पुण्यात कोर्टात हजर राहू शकले नव्हते. त्यामुळे दोन वेळा हजर राहण्यासाठी समन्स बजावून देखील हजर न झाल्याने कोर्टाने मनोज जरांगे यांच्यासह अन्य दोन जणांवर अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. 2 ऑगस्टला पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर पार पडणाऱ्या सुनावणीस मनोज जरांगे यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मनोज जरांगे मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास पुण्यात दाखल झाले आहेत. ते आज सुनावणीला हजर राहणार आहेत.

मनोज जरांगे मध्यरात्री 2 वाजता पुण्यात दाखल

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती बरी नसताना देखील ते गुरुवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास पुण्यात दाखल झाले आहेत. आज ते पुणे सत्र न्यायालयात हजर राहणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 02-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow