लांजातील रुण गावातील रस्त्याची दुर्दशा

Aug 2, 2024 - 10:51
Aug 2, 2024 - 11:55
 0
लांजातील रुण गावातील रस्त्याची दुर्दशा

लांजा : तालुक्यातील रुण गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डेच असल्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्यामुळे पादचारी, वाहनचालक आणि प्रवाशांची गैरसोय होत आहे.

रुण रस्त्त्यावरून वाहने काढताना वाहनचालकांना त्यामध्ये विशेषतः दुचाकी आणि रिक्षासारखी वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते. या रस्त्यावरून एसटी वाहतूकदेखील सुरू आहे. या गावातील अनेक विद्यार्थी लांजा-साटवली या ठिकाणी हायस्कूल तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात जात असतात. तसेच अन्य प्रवाशांचाही समावेश आहे. रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही वर्षापासून या रस्त्याचे डांबरीकरण झाले नसल्याने ही वेळ आली आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित हा रस्ता येतो. संबंधित विभागाने गणपतीपूर्वी रस्त्याची डागडुजी करावी तसेच या रस्त्याचे पावसाळ्यानंतर तातडीने डांबरीकरणाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी रुण ग्रामपंचायतीचे माजी सदस्य महेश जाधव यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 02/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow