गुहागर : शिवराम गृहनिर्माण संस्थेचा स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा

Aug 2, 2024 - 11:10
Aug 2, 2024 - 15:14
 0
गुहागर : शिवराम गृहनिर्माण संस्थेचा  स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा

गुहागर : गुहागर शहरातील शिवराम सहकारी गृहनिर्माण संस्थेने सांडपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नगरपंचायतीकडे मागणी केली होती. मात्र, ही समस्या सोडवली नसल्यामुळे संस्थेतील पुढील सभासद येत्या १५ ऑगस्ट रोजी नगरपंचायत गुहागर समोर उपोषणास बसणार आहेत. या संदर्भात सभासदांनी न.पं. अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

येथील सांडपाणीचा स्वखचनि विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याची पाईपलाईन नगरपंचायतने उद्ध्वस्त करून टाकली. नगरपंचायतकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणत्याही पत्राची गांभिर्यान दखल घेतली जात नाही. मुख्याधिकारी उपलब्ध नाहीत, असे नेहमी सांगितले जाते. चर्चेसाठी पत्राद्वारे वेळ मागूनही मिळत नाही. नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम २०४ (१) अन्वये आमच्या इमारतीतील मोऱ्यांचे पाणी नगरपरिषदेच्या मोरीत सोडण्याचा आम्हाला हक्क आहे. 

तरी नगरपंचायतीच्या मोरीत सोडण्यास लेखी परवानगी मिळावी. आम्हाला परवानगी न दिल्यास गुहागर शहर परिसर व बाजारपेठेत ज्या ज्या ठिकाणी मोरीचे पाणी नगरपंचायतीच्या मोरीत सोडण्यात आले आहे, ते सर्वच्या सर्व पाणी तातडीने बंद करावे.

तसेच नगरपंचायतीने जप्त केलेला आमचा पाईप सुस्थितीत परत मिळावा. अन्यथा संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पांडुरंग दाते यांच्या नेतृत्वाखाली सभासद येत्या १५ ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे निवेदन शिवराम सहकारी गृहनिर्माण संस्थेने गुहागर नगरपंचायतीला दिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:37 PM 02/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow