गुहागर : बळीराज सेनेच्या वतीने संपर्क मोहीम

Aug 5, 2024 - 11:07
Aug 5, 2024 - 14:29
 0
गुहागर : बळीराज सेनेच्या वतीने संपर्क मोहीम

गुहागर : गुहागर विधानसभा संपर्कप्रमुख शरद बोबले यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुहागर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक वाडी व गावातील विकास कामे व तेथील स्थानिक प्रश्न मार्गी लागावेत यासाठी बळीराज सेनेच्या वतीने संपर्क मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती संपर्कप्रमुख शरद बोवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या माध्यमातून गुहागर, खेड व चिपळूण तालुक्यातील नागरिकांशी संपर्क साधण्यात येणार आहे. तसेच पक्षाच्या वतीने मुंबई व स्थानिक पातळीवर संपर्क मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी पक्षाच्या वतीने दर गुरुवार व शुक्रवारी मुंबई पक्ष कार्यालयामध्ये पदाधिकारी उपलब्ध असतील, अशी माहिती बोबले यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना संपर्कप्रमुख बोबले म्हणाले, गुहागर विधानसभा मतदारसंघात गुहागर तालुका व खेड, चिपळूण तालुक्यातील काही गावे समाविष्ट आहेत. वर्षानुवर्षे या गावांमध्ये अनेक कामे
रखडलेली आहेत. प्रलंबित विकासकामे सरकारी तसेच प्रशासकीय पातळीवर मार्गस्थ व्हावी, यासाठी बळीराज सेनेच्या वतीने संपर्क मोहीम राबवून ती पूर्ण करण्याचा मानस आहे. यासाठी स्थानिक व मुंबई पातळीवरचे काही कार्यकर्ते काम करणार आहेत. संबंधित नागरिकांनी गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पक्ष कार्यालय मुलुंड (मुंबई) येथील कुणबी वसतिगृह, ९० फीट रोड, आंबेडकरनगर, गॅलेक्सी हॉटेलजवळ, मुलुंड पूर्व, मुंबई येथे सायं. दर गुरुवारी व शुक्रवारी पाच ते सात यावेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:55 PM 05/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow