रत्नागिरीत पावसाची विश्रांती
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. गुरुवारसह शुक्रवारी देखील अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली.
शुक्रवारी सकाळी शहरासह ग्रामीण भगात पावसाने उघडीप घेतली होती. त्यामुळे तापमातही वाढ झाली. काही भागात सकाळी उन्हही पडले होते.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात केवळ ७.५९ मि.मी. सरासरीने एकूण ६८.३० मिलिमीटर पाऊस झाला. यामध्ये जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यातून अपवादात्मक सरींची हजेरी वगळता पावसाने विश्रांती घेतली. रत्नागिरी जिल्ह्यातील सात तालुक्यात शुक्रवारी एक अंकी पावसाची तर दोन तालुक्यांत दोन अंकी पावसाची नोंद झाली आहे. दोन तालुक्यापैकी खेड तालुक्यात १२ तर रत्नागिरी तालुक्यात १० मि. मी. पावसाची नोंद झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 10-08-2024
What's Your Reaction?