नाणार पाठोपाठ आता सागवे घोडेपोईवाडीतही बॉक्साईट प्रकल्प; 5 सप्टेंबरला जनसुनावणी

Aug 6, 2024 - 12:26
 0
नाणार पाठोपाठ आता सागवे घोडेपोईवाडीतही बॉक्साईट प्रकल्प; 5 सप्टेंबरला जनसुनावणी

राजापूर : नाणार पाठोपाठ आता सागवे घोडेपोईवाडी येथे अजुन एका बॅक्साईड उत्खनन प्रकल्पाची घोषणा राज्यशासनाने केली असुन या प्रकल्पासाठीची पर्यावरण जनसुनावणी ५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता कात्रादेवी मंगल कार्यालय कात्रादेवी सागवे येथे होणार आहे .

रिफायनरी प्रकल्पाची प्रतिक्षा करता करता आता समुद्रकिणारपट्टी पोखरणारे बॉक्साईट उत्खननाचे प्रकल्प राजापूर तालुकावासियांच्या माथी मारले जात असल्याने याचा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे .

नाणार परिसरातील सुमारे १४५ हेक्टर वर होणाऱ्या बॉक्साईट उत्खननाच्या प्रकल्पाची जनसुनावणी २९ ऑगस्ट २०२४ रोजी नाणार येथे होणार आहे . त्याबाबतची जाहीर नोटीस शासनाने प्रसिध्द करुन आठवड्याचा कालावधी लोटण्याअगोदरच आता शासनाने सागवे घोडेपोईवाडी येथे प्रस्तावित असणाऱ्या दुसऱ्या बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाच्या जनसुनावनीची तारीख जाहीर केली आहे . त्यामुळे गणपती सणांच्या पार्श्वभुमीवर या भागात रिफायनरीच्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा बॉक्साईट उत्खनन विरोधी आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे.

पर्यावरणपुरक प्रकल्प यावे अशी लोकांची मागणी

कोकणात पर्यावरणपुरक उद्योग आणा , येथील निसर्गाची हानी करणारे प्रकल्प आम्हाला नकोत अशी मागणी येथील जनतेची असताना आता संपुर्ण कोकणपट्टी पोखरणारे प्रकल्प या परिसरात येऊ घातल्याने जनक्षोभ उसळण्याची दाट शक्यता आहे . सागवे हमदरा घोडेपोईवाडी येथे १२० . ४८ हेक्टरवर हा बॅक्साईट उत्खनन प्रकल्प प्रस्तावित असुन मे . गामा आर्यन इंडिया लिमिटेड , रत्नागिरी ही कंपणी याठिकाणी बॉक्साईटचे उत्खनन करणार आहे . महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ , उप प्रादेशिक कार्यालय रत्नागिरी यानी याबबतचे जाहीर नोटीस दिनांक ३ ऑगस्ट २०२४ रोजीच्या पत्राने ग्रामपंचायत सागवे याना कळवले आहे .

भारत सरकारच्या वने व पर्यावरण मंत्रालयाने दिनांक १४ सप्टेंबर २००६ रोजी या प्रकल्पाची अधिसुचना काढलेली असुन सावगे हमदारे घोडेपोईवाडी येथेले १२० . ४८ हेक्टर क्षेत्रावर प्रतिवर्ष ०. ३ मेट्रिक टन इतके उत्खनन करण्यात येणार आहे . गणपती आगमनाच्या अगोदर दोन दिवस जाहीर झालेल्या या जनसुनावणीमुळे या परिसरात तिव्र असंतोष निर्माण झाला आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 06-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow