राजापूर : धोपेश्वरमधील अनधिकृत बांधकामाबाबत स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा

Aug 7, 2024 - 12:20
Aug 7, 2024 - 12:41
 0
राजापूर : धोपेश्वरमधील अनधिकृत बांधकामाबाबत स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा

राजापूर : राजापूर शहरालगतच्या धोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरशा बाबत अनेक वेळा तक्रारी करुनही व प्रांताधिकारी यानी दिलेल्या आदेशान्वये अद्यापही सदर मदरशावर कारवाई करुन तो बंद न केल्याने धोपेश्वर पन्हळे येथील ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

याबाबतचे निवेदन धोपेश्वर पन्हळे येथील ग्रामस्थ अमोल सोगम यांनी प्रशासनाला दिले आहे. गेली दोन वर्ष राजापूर शहरालगतच्या धोपेश्वर पन्हळे येथे अनधिकृतपणे सुरु असणारा मदरसा तत्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाकडे केलेली असताना अद्यापही हा मदरसा बंद न केल्याने आता येथील ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. 

या अगोदर या मदरशा विरोधात येथील ग्रामस्थांनी २६ जानेवारी २०२४ रोजी ग्रामपंचायत धोपेश्वर कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. मात्र प्रशासनाने याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने हे उपोषण स्थगित करण्यात आले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:09 07-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow