खेड : कोरेगाव-संगलट येथील रस्त्यावर भगदाड

Aug 7, 2024 - 11:40
Aug 7, 2024 - 13:49
 0
खेड : कोरेगाव-संगलट येथील रस्त्यावर भगदाड

खेड : तालुक्यातील कोरेगाव - संगलट रस्त्यावर संगलट गावच्या हद्दीमध्ये श्रासरा या ठिकाणी रस्त्याला मधोमध भगदाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. हा प्रकार घडला तेव्हा एक ट्रक व एसटी या मार्गावरून जात होती. चालकांच्या सतर्कतेने येथे विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा अपघात टळला, खेड तालुक्यातील ग्रामीण भागाला प्रशासनाच्या गलथान कारभाराने अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील कोरेगाव ते संगलट रस्त्याच्या दूरस्थेबावत प्रवाशानी सातत्याने प्रशासनाकडे माहिती दिली होती. परंतु प्रशासनाने त्याकडे गांभीयनि पाहिले नाही. गेले काही दिवस जीव मुठीत धरून लोकांना येथे प्रवास करावा लागत होता. मंगळवारी दि.६ रोजी सकाळी या मार्गावर मधोमच मोठे भगदाड पडले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर वाहतूक बंद करण्यात आली आहे

काही महिन्यापूर्वी याच ठिकाणी रस्त्याच्या दुर्वस्थेमुळे एसटी बस उलटत असताना चालकाच्या सतर्कतेमुळे वाचली होती. या गाडीत सुमारे ३५ ते ४० विद्यार्थी व प्रवासी होते. त्यावेळी देखील संबंधित बांधकाम खात्याला सदर रस्ता ची दुरुस्ती बाबत ग्रामस्थांनी कळवले होते. परंतु दुरुस्ती करण्यात आलेली नाही. मंगळवारी ट्रक आणि एसटी या मार्गावरून प्रवास करत असताना रस्त्याच्या मधोमध भगदाड पडले. चालकांच्या सतर्कतेमुळे पुन्हा लोकांचे जीव वाचले असेल तरी आता वाहतूक ठप्प झाल्याने ग्रामस्थांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 

वाहतूक बंद झाल्यामुळे मंगळवारी संगलट पंचक्रोशीतील विद्यार्थी, कामगार व रुग्णांना दवाखान्यात देखील नेता आले नाही. याबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 07/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow