विनेश फोगाटच्या अपात्रतेवरून लोकसभेत गदारोळ; 'क्रीडामंत्री जवाब दो'च्या घोषणा, 3 वाजता क्रीडामंत्री देणार उत्तर
नवी दिल्ली : भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) ने 50 किलो फ्रीस्टाइल गटात शानदार कामगिरी करताना अंतिम फेरीमध्ये मजल मारली.मात्र अंतिम सामन्याआधी विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे.
विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन स्पर्धेआधी 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे विनेश फोगाटला (Vinesh Phogat) अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावं लागतं. परंतु तिचं वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आल्याचं सांगत तिला अपात्र ठरवण्यात आलं आहे. विनेश फोगाट रौप्य आणि कांस्य पदकासाठीही पात्र होणार नाही. यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
विनेश फोगाट (Vinesh Phogat)अपात्र ठरल्यानंतर लोकसभेत गदारोळ निर्माण झाला आहे. क्रीडामंत्री जवाब दो अशा घोषणा लोकसभेत देण्यात येत आहेत. मोठा गोंधळ सभागृहात दिसून येत आहे. स भागृहात क्रीडामंत्री जवाब दो च्या घोषणा देण्यात येत आहेत. सभागृहात मोठा गोंधळ सुरू आहे, तर आज दुपारी तीन वाजता क्रीडामंत्री याबाबत उत्तर देणार असल्याची माहिती आहे. तर भारतीय कुस्ती संघटना अपात्रतेविरोधात अपील करणार असल्याची माहिती आहे.
नेमकं काय घडलं?
विनेश फोगाट चे वजन जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर मंगळवारी रात्रभर भारतीय पथकाकडून रात्रभर हालचाली सुरु होत्या. मात्र, बुधवारी सकाळी झालेल्या तपासणीवेळी विनेश फोगाटचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. यानंतर विनेश फोगाटकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आता ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय पथकाकडून उर्वरित सामन्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.
कुस्तीमध्ये वजनाचे नियम काय आहेत?
वजनाच्या नियमांनुसार, जेव्हा जेव्हा कुस्तीपटूला स्पर्धा करायची असते तेव्हा त्या दिवशी त्याचे वजन तपासले जाते. प्रत्येक वजनी गटाचे सामने दोन दिवसांत होतात, त्यामुळे अंतिम फेरीत पोहोचलेल्या कुस्तीपटूंना दोन्ही दिवस वजन करावे लागते. प्रथमच वजन करताना, कुस्तीपटूकडे वजन करण्यासाठी 30 मिनिटे आहेत. या कालावधीत, ते त्यांना पाहिजे तितक्या वेळा वजन करू शकतात. यादरम्यान, कुस्तीपटूला कोणताही संसर्गजन्य आजार नसून त्याची नखे खूपच लहान असल्याचेही दिसून येते. ज्या कुस्तीपटूंना सलग दुसऱ्या दिवशी स्पर्धा करावी लागते त्यांना वजनासाठी 15 मिनिटे मिळतात. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) च्या नियमांनुसार, जर कुस्तीपटूचे वजन निर्धारित वजनापेक्षा जास्त असेल तर त्याला अपात्र ठरवले जाते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:12 07-08-2024
What's Your Reaction?