महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा : तहसीलदार श्रीधर गालिपेल्ली

Aug 7, 2024 - 11:09
Aug 7, 2024 - 14:25
 0
महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा : तहसीलदार श्रीधर गालिपेल्ली

मंडगणड : महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. तो शासन व जनतेमधील एक महत्त्वाचा दुवा असल्याचे प्रतिपादन तहसीलदार श्रीधर गालिपेल्ली यांनी केले.

येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंडणगड तहसीलदार कार्यालय महसूल विभाग व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 'महसूल पंधरवडा' दिनानिमित्त 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' अंतर्गत नुकतेच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून मंडणगडचे तहसीलदार श्रीधर गालिपेल्ली व मंडल अधिकारी नीलेश गोडघासे उपस्थित होत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, डॉ. भरतकुमार सोलापुरे, डॉ. शैलेश भैसारे, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप, तहसीलदार कार्यालयातील किरण चव्हाण आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. शैलेश भैसारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. यावेळी नीलेश गोडघासे, प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. शैलेश भैसारे यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 07/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow