विनेश फोगाटचं वजन काल 50 किलोच्या आत, आज 100 ग्रॅम कसं वाढलं?, चक्रावणारे 10 मुद्दे

Aug 7, 2024 - 14:04
 0
विनेश फोगाटचं वजन काल 50 किलोच्या आत, आज 100 ग्रॅम कसं वाढलं?, चक्रावणारे 10 मुद्दे

पॅरिस ऑलिम्पिकमधील (Paris Olympics 2024) 50 किलो फ्रीस्टाइल गटात अंतिम फेरी गाठणारी भारताची धाकड गर्ल कुस्तीपटू विनेश फोगाटला (Vinesh Phogat Disqualified)अपात्र ठरवण्यात आले आहे.

विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र विनेश फोगाटचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त आढळून आल्याने विनेश फोगाटला अपात्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

विनेश फोगाटला काल एका दिवसात तीन लढती खेळाव्या लागल्या. या तीन लढती खेळल्यामुळे तिच्या शरीरातील लिक्विड कमी झाले. म्हणूनच ऑलिम्पिक कमिटीच्या वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानुसार डीहायड्रेट होऊ नये यासाठी तिला लिक्विड देण्यात आले. त्यामुळेच जेव्हा विनेश फोगाटचे वजन केले गेले तेव्हा पोटातील ते लिक्विडमुळे तिचे वजन वाढले, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विनेश फोगाटच्या अपात्रेनंतर चक्रावून टाकणार 10 मुद्दे-

१) विनेश फोगट ही मूळची 53 किलो वजनी गटाची पैलवान होती.
३) पण 53 किलो वजनी गटातून पैलवान अंतिम पंघाल खेळत असल्यानं विनेशसमोर 50 किलो वजनी गटातून खेळण्याचा पर्याय होता.
३) किर्गिस्तानमधल्या आशियाई पात्रता कुस्तीत खेळून ती पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो गटात खेळण्यासाठी पात्र ठरली.
४) पण मूळ 53 किलो वजनी गटातल्या पैलवानाला सतत 50 किलोच्या आत राहाणं सोपं नसतं.
५) त्यात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेचं आयोजन एकऐवजी दोन दिवसांवर झालं. त्यामुळं पैलवानांची वजनं एकऐवजी दोन दिवसं होणार हे निश्चित झालं होतं.
६) या परिस्थितीत विनेशचं वजन दोन दिवस नियंत्रणात राहण्यासाठी अधिक दक्ष राहाणं अपेक्षित होतं.
७) विनेशचं कुस्तीच्या पहिल्या दिवशी म्हणजे काल सकाळी भरलेलं वजन 50 किलोच्या आत होतं. त्यामुळं काल ती खेळू शकली.
८) पण काल तीन कुस्त्या जिंकताना, त्यादरम्यान आणि त्यानंतर काय खाल्लं, ती किती पाणी प्यायली यावर लक्ष ठेवण्याची आवश्कता होती. ते झालं का?
९) दिवसभरात तीन कुस्त्या खेळून थकलेल्या विनेश फोगटला तिचं वजन घटवण्यासाठी आणखी किती मेहनत घ्यावी लागली?
१०) विनेशचं 100 ग्रॅम जादा वजन घटवण्यासाठी आणखी काय करता आलं असतं?, कारण तिच्या सासरे राजपाल राठी यांनी केस बारीक करता आले असते असा पर्याय बोलून दाखवला आहे.

विनेश फोगाटकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही-

स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. विनेश फोगाटचे वजन जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर मंगळवारी रात्रभर भारतीय पथकाकडून रात्रभर हालचाली सुरु होत्या. मात्र, बुधवारी सकाळी झालेल्या तपासणीवेळी विनेश फोगाटचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. यानंतर विनेश फोगाटकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:12 07-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow