Ratnagiri : वाढत्या उष्म्यामुळे आठवडाभरातत ५.०३ टक्के पाण्याचे बाष्पीभवन

Jun 1, 2024 - 17:07
 0
Ratnagiri : वाढत्या उष्म्यामुळे आठवडाभरातत ५.०३ टक्के पाण्याचे बाष्पीभवन

रत्नागिरी : वाढत्या उष्म्यामुळे जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या धरणांमधील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले आहे. गेल्या आठवड्यात धरणातील पाणीसाठा ९३.४७ टक्के होता. बाष्पीभवन होऊन या आठवड्यात तो ८८.४४ टक्के झाला आहे. म्हणजे ५.०३ टक्केने धरणातील पाणीसाठा घटला आहे. टक्केवारीमध्ये जिल्ह्यात आजमितीला ४६ लघुपाटबंधारे प्रकल्पांमध्ये ३७.४१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

पाटबंधारे विभागामार्फत दर शुक्रवारी जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे विभागाच्या धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेतला जातो. त्यानुसार ही आकडेवारी पाटबंधारे विभागाकडून उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील ३ मध्यम पाटबंधारे प्रकल्प आणि ४६ लघु प्रकल्प (धरण) आहेत. सामूहिक शेती किंवा दुबार पिकांसाठी धरणातील पाण्याचा शेतकऱ्यांकडून अत्यल्प वापर होतो. त्यामुळे पाण्याची पातळी घटण्यामागे कडक उन्हाळा आहे. जिल्ह्यात उष्म्याचा पारा ३८ अंशापर्यंत जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन धरणातील पाणी झपाट्याने घटत आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या ३७.४१ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. नातूवाडी मध्यम प्रकल्पामध्ये ७.६९७ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा आहे. गडनदी प्रकल्पामध्ये ६१.६० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. अर्जुना धरण प्रकल्पामध्ये ५५.०६९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. कडक उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाल्याचे पाटबंधारे विभागाच्या अहवालात स्पष्ट
झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:34 01-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow