भाजपसोबत असताना सर्व निर्णय मातोश्रीवर व्हायचे, आता उद्धव ठाकरेंवर दिल्लीत गांधींच्या दारात उभं राहण्याची वेळ : रावसाहेब दानवे

Aug 8, 2024 - 15:38
 0
भाजपसोबत असताना सर्व निर्णय मातोश्रीवर व्हायचे, आता उद्धव ठाकरेंवर दिल्लीत गांधींच्या दारात उभं राहण्याची वेळ : रावसाहेब दानवे

मुंबई : "देवेंद्र फडणवीस (DevendraFadnavis) आणि एकनाथ शिंदे (EknathShinde) दिल्लीला गेले. तेव्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, महाराष्ट्र आम्ही दिल्लीच्या इशाऱ्यावर चालू देणार नाही.

आता ठाकरे दिल्लीला कशासाठी गेले. आता त्यांनी कोणाचा इशारा घेतला. आज उद्धव ठाकरे (UddhavThackeray) कोणाच्या दारात जाऊन उभे राहिले. आमच्या युतीच्या काळात जागा वाटपाचे निर्णय, निवडणुकीची रणनिती प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्यापासून आतापर्यंत मातोश्रीवर ठरवले जायचे. आता मातोश्रीतून बाहेर पडत राहुल गांधी आणि खरगेजींच्या दारात उभं राहण्याची पाळी राज्यातील जनतेने आणली आहे", असे भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

उद्धव ठाकरेंनी असंगाशी संगत केली

रावसाहेब दानवे म्हणाले, महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुकीमध्ये आपण यशस्वी व्हावं. यासाठी विरोधी पक्ष प्रयत्न करत आहेत. पर्वा उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन आले. दिल्लीमध्ये त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेकडे आपण पाहिलं तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की, जनतेच्या न्यायालयात जाऊन आम्ही न्याय मागणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे, जनतेच्या न्यायालयाचा किंवा जनमताचा 2019 अनादर कोणी केला असेल तर तो उद्धव ठाकरेंनी केलाय. उद्धव ठाकरेंनी असंगाशी संगत केली आणि आपलं सरकार बनवलं, असंही रावसाहेब दानवेंनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंची भाषा चिथावणी खोर आहे

पुढे बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, दिल्लीतील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी मी किती चांगला मुख्यमंत्री होतो, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सरकारमध्ये काही मित्र असलेल्यांनी लिहिलं की, पूर्ण कालावधीमध्ये उद्धव ठाकरे केवळ एक दिवस मंत्रालयात आले. याचा अर्थ असा की ठाकरे सर्वांत अपयशी मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांनी जनादेशाची भाषा वापरणे चुकीचे आहे. बांगलादेशच्या परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं. उद्धव ठाकरेंनी ते हिंदूत्ववादी असल्याचं वक्तव्य अनेकदा केलं. आताच्या काळात ते करत नाहीत. परंतु त्याठिकाणी बांगलादेशात जी परिस्थिती झाली. ती आपल्या देशात सुद्धा होऊ शकते, अशा प्रकारचं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलेले आहे. मला वाटतं ही त्यांची चिथावणी खोर भाषा आहे. ज्या ठिकाणी हिंदूंची हत्या होते, त्याचा निषेध करण्याएवढे तरी त्यांचे हिंदूत्व जागरुक असायला हवे होते. परंतु हे सुद्धा ते दाखवू शकले नाहीत. याचा अर्थ हिंदूत्वापासून उद्धव ठाकरे दूर गेले. हे आपल्या सर्वांच्या लक्षात येतय. त्यांचा तीन दिवसांचा दिल्ली दौरा होता. ते कशासाठी गेले, असा सवालही रावसाहेब दानवे यांनी केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:06 08-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow