पाचलमध्ये 'माझा अधिकार' शैक्षणिक उपक्रमाला प्रतिसाद

Aug 8, 2024 - 11:38
Aug 8, 2024 - 15:40
 0
पाचलमध्ये 'माझा अधिकार'  शैक्षणिक उपक्रमाला प्रतिसाद

पाचल : शासनाचा शिक्षण सप्ताह उपक्रम सर्वच शाळा व माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे औचित्य साधून सफाई कामगार परिवर्तन संघाच्या वतीने माझा अधिकार हा शैक्षणिक उपक्रम पाचल विभागातील अनेक शाळांमध्ये राबविण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे (मुंबई) संशोधक सुमेध हरळकर यांनी माझा अधिकार या शैक्षणिक उपक्रमाची विद्यार्थ्यांना माहिती दिली. या उपक्रमातून मुलांचे विशेष अधिकार जसे जगण्याचा अधिकार, संरक्षणाचा अधिकार, विकास व प्रगतीचा अधिकार, सहभागाचा अधिकार या संदर्भात सविस्तर माहिती विविध खेळाच्या माध्यमातून दिली. या सोबत लैंगिक समानता आणि लैंगिक शोषण या विषयांवर फिल्म, ग्रुप वर्कच्या माध्यमातून उद्बोधनपर माहिती दिली. हा शैक्षणिक उपक्रम वैभववाडी तालुक्यातील नेर्ले-तिरवडे हायस्कूल, जिजामात विद्यामंदिर रायपाटण, पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा तळवडे क्र. २. हरळ पूर्ण प्राथमिक शाळा रत्नागिरी या ठिकाणी राबविण्यात आला. हा कार्यक्रम राबविण्यासाठी अस्थी रोगतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. एन. एस. लाड आणि शामला ट्रस्ट यांचे मोलाचे योगदान लाभले. यावेळी सफाई कामगार परिवर्तन संघाचे अध्यक्ष रमेश हरळकर, रायपाटण जिजामाता विद्यमंदिरचे मुख्याध्यापक दामोदर लिंगायत, नेर्ले-तिरवडे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुतार, तलवडे शाळा क्र. २ चे मुख्याध्यापक अनाजी मासये, माजी सरपंच विलास गांगण, पत्रकार सुरेश गुडेकर आदि उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:02 PM 08/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow