मंडणगड तालुक्यातील विविध मागण्यांसाठी राजेश गमरे यांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण

Aug 9, 2024 - 10:29
Aug 9, 2024 - 11:30
 0
मंडणगड तालुक्यातील विविध मागण्यांसाठी राजेश गमरे यांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण

मंडणगड : तालुक्यातील विविध समस्यांसंदर्भात समस्या निराकरणाच्या मागणीकरिता सामाजिक कार्यकर्ते राजेश गमरे यांनी नुकतेच तहसीलदार कार्यालयात निवासी नायब तहसीलदार यांची भेट घेऊन स्वातंत्र्यदिनी आमरण उपोषण करण्यासंदर्भात निवेदन सादर केले आहे.

तालुक्यातील शासकीय कार्यालयातील आस्थापनेतील रिक्त पदे भरणे, तालुक्यातील ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्ण वेळ एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करणे, रायगड व रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून नवीन मंडणगड जिल्हा निर्मिती करणे, मंडणगड शहरातील मुख्य चौकात व तहसील कार्यालयासमोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्यात यावे, बागमांडला बाणकोट सागरी पुलाचे काम पूर्ण करणे, अवैद्य वृक्षतोड थांबवणे, मंडणगड पोलिस ठाणे व तहसील कार्यालयासाठी नवीन इमारत तयार करणे, मंडणगड व बाणकोट पोलिस ठाणेमधील अधिकारी, कर्मचारी यांच्या निवासाची व्यवस्था करणे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

या मागण्या मान्य न झाल्यास स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा इशारा गमरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. हे निवेदन देताना महेंद्र यादव, राजेश साळवी, राजेश खैरे, दिनेश राऊत, गणेश जाधव, सागर खैरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 09/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow