अमूल दुधाच्या दरात वाढ

Jun 3, 2024 - 10:59
 0
अमूल दुधाच्या दरात वाढ

मुंबई : लोकसभा निवडणूक निकालाची धामधूम सुरु असतानाच दुधाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. अमूल दुधाच्या किमतीत दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांची वाढ जाहीर केल्याचं सांगितलं.

प्रसिद्धीपत्रकाद्वारे दुधाच्या किंमतीत वाढ झाल्याची माहिती दिली. आजपासून अमूल दूध खरेदी दोन रुपयांनी महाग होणार आहे. अमूलच्या नवीन किमतींनुसार, अमूल गोल्ड 500 मिली लिटरमागे 2 रुपयांनी वाढून ३३ रुपये झालं आहे. सोमवारपासून या किंमती लागू होणार आहेत.

GCMMF ने आज जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात सांगितले की, एकूणच ऑपरेशन आणि दुधाचे उत्पादन खर्च वाढल्याने दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. "किमती वाढल्याने अमूलच्या तिन्ही प्रमुख दुधाच्या प्रकारांवर परिणाम होईल. अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल टी स्पेशल याच्या किंमतीत वाढ कऱण्यात आली आहे. " असे GCMMF ने म्हटले आहे.

अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल टी स्पेशल या दूधाच्या किंमतीत वाढ झाली आहे. आता अमूल गोल्डची किंमत 66 रुपये/लीटर इतकी झाली आहे. याधी अमूल गोल्डची किंमत 64 रुपये/लीटर इतकी होती. अमूल टी स्पेशलची किंमत 62 रुपयांवरुन 64 रुपये प्रति लीटर झाली आहे. एवढंच नाही तर अमूल शक्तीचा भाव 60 रुपयांवरून 62 रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढणार असून, दह्याचे दरही वाढले आहेत. दरम्यान, फेब्रुवारी 2023 पासून दुधाच्या किंमतीमध्ये कोणताही वाढ कऱण्यात आलेली नव्हती. पण दुधाचे उत्पादन खर्च वाढल्याने दुधाच्या किंमतीत वाढ करावी लागत असल्याचे GCMMF ने सांगितले. 

प्रति लिटर दोन रुपयांची वाढ म्हणजे एमआरपीमध्ये 3-4 टक्के वाढ होते, जी सरासरी अन्नधान्य महागाईपेक्षा खूपच कमी आहे. फेब्रुवारी 2023 पासून अमूलने प्रमुख बाजारपेठांमध्ये दुधाच्या किंमतीत कोणतीही वाढ केलेली नाही, असे जीसीएमएमएफने म्हटले आहे. दूध उत्पादन आणि ऑपरेशन खर्चात वाढ झाल्यामुळे दुधाच्या किंमतीत वाढ केल्याचा दावा अमूलने केला आहे. गेल्या वर्षी अमूलच्या दूध संघांनी शेतकऱ्यांच्या दरात सरासरी 6 ते 8 टक्क्यांनी वाढ केली होती. अमूलच्या धोरणानुसार, ग्राहकांनी भरलेल्या 1 रुपयांपैकी 80 पैसे दूध उत्पादकाला जातात.

भारतात दुधाचे दर का वाढतात?
दुधाचे दर वाढण्याचे प्राथमिक कारण म्हणजे उत्पादन खर्चात झालेली वाढ. जागतिक दुधाच्या उत्पादनाच्या 22% पेक्षा जास्त असलेला भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 03-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow