मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री २१ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत

Aug 10, 2024 - 15:37
 0
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री २१ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दि. २१ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने 'सह इतर विकास कामांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

लाडकी बहीण योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित रत्नागिरीत शुभारंभ कार्यक्रम होणार आहे. २१ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी जिल्ह्यातील पाच हजार महिलांना एकत्र आणले जाणार असून, हा कार्यक्रम १७ ऑगस्ट रोजी होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात २१ रोजी रत्नागिरी विमानतळ टर्मिनलच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. सुमारे शंभर कोटी रुपयांचे हे काम आहे. त्याचप्रमाणे इंजिनिअरिंग कॉलेजच्या इमारतीचे उद्घाटन होणार असून, या कॉलेजला लोकनेते स्व. शामरावजी पेजे यांचे नाव दिले जाणार असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:04 PM 10/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow