CIBIL स्कोरच्या संदर्भात RBI ने नियमात केला मोठा बदल

Aug 12, 2024 - 11:25
 0
CIBIL स्कोरच्या संदर्भात RBI ने नियमात केला मोठा बदल

नवी दिल्ली : कर्ज मिळवण्यासाठी सिबील स्कोर असणं खूप महत्वाचं असतं. सिबील स्कोर (CIBIL Score) चांगला असल्यास कर्ज मिळवण्यात अडचण येत नाही. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने याबाबतच्या नियांमध्ये बदल केले आहेत.

आता नवीन नियमानुसार, ग्राहकांचा सिबील स्कोर प्रत्येक 15 दिवसानंतर अपडेट केला जाणार आहे. त्यामुळं ग्राहकांना त्यांचा CIBIL स्कोर चांगला ठेवावा लागणार आहे. दरम्यान, हा नवीन नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू केला जाणार आहे.

वित्तीय संस्थांनी लवकरात लवकर क्रेडीट स्कोअर अपडेट करावा

दरम्यान, तुम्हला या नवीन CIBIL स्कोरच्या संदर्भात माहिती असणं गरजेचं आहे. तुमचा जर सिबील स्कोर खराब असेल तर तुम्हाला पुढच्या वेळी कर्ज मिळवण्यासाठी बँकांमध्ये फेऱ्या माराव्या लागतील. जे लोक वेळेवर कर्जाची परतफेड करणार नाहीत, त्यांना हा फटका बसणार आहे. दर 15 दिवसानंतर ग्राहकांचा सिबील स्कोर अपडेट केला जाणार आहे. त्यामुळं वित्तीय संस्थांनी लवकरात लवकर क्रेडीट स्कोअर अपडेट करावा असं आरबीआयने म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबतची माहिती दिलीय.

बँक आणि ग्राहक या दोघांनांदी फायदा होणार

मिळालेल्या माहितीनुसार CIBIL स्कोर हा दर महिन्याच्या 15 तारखेला आणि महिन्याच्या शेवटी अपडेट केला जाऊ शकतो. क्रेडिट संस्था आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या त्यांच्या इच्छेनुसार देखील तारखा निश्चित करु शकतात. ज्या अंतर्गत डेटा अपडेट केला जाऊ शकतो. क्रेडिट संस्थांनी ग्राहकांची क्रेडिट माहिती दर महिन्याला सीआयसी यांच्याकडे सबमिट करणं आवश्यक आहे. दरम्यान, या निर्णयाचा बँक आणि ग्राहक या दोघांनांदी फायदा होणार आहे. बँक आणि एनबीएफसी या दोन्हींसाठी देखील क्रेडिट माहिती खूप महत्वाची आहे. याद्वारे ते कोणाला कर्ज द्यायचे आणि कोणाला देऊ नये याबद्दल अधिक चांगला निर्णय घेऊ शकतात. यामुळं कर्जावर आकारण्यात येणारा व्याजदर ठरवण्यात देखील मदत होणार आहे. चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना कमी दरात कर्ज मिळू शकतो.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 12-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow