राजापूर-जैतापूर-बोरिवली एस.टी. बसचे आरक्षण सुरू नसल्याने चाकरमान्यांमध्ये नाराजी

Aug 12, 2024 - 16:38
 0
राजापूर-जैतापूर-बोरिवली एस.टी. बसचे आरक्षण सुरू नसल्याने चाकरमान्यांमध्ये नाराजी

राजापूर : राजापूर-जैतापूर-बोरिवली स्लीपरकोच आणि विजयदुर्ग- जैतापूर-बोरिवली या एसटी बसची मुंबईतून गणेशोत्सवासाठी होणारी आरक्षण सुविधा अद्याप सुरू न झाल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे ही सुविधा त्वरित सुरु करावी, अशी मागणी जैतापूरचे माजी सरपंच गिरीश करगुटकर यांनी केली आहे. 

राजापूर डेपोची राजापूर-जैतापूर- बोरिवली अशी स्लीपरकोच गाडी सणाच्या दरम्यान सुरु करण्यात येते. तसेच विजयदुर्ग डेपोची विजयदुर्ग - जैतापूर-बोरिवली अशीही एसटी बस सुरु असते. त्याचे आगाऊ आरक्षणही सुरु करण्यात येते. मात्र मुंबईवरुन या दोन्ही एसटी बसचे आरक्षण गणेशोत्सवाला एक महिना असताना अद्याप सुरु करण्यात आलेले नाही. त्यामुळे चाकरमान्यांमध्ये नाराजी पसरली आहे. गणेशभक्तांना दिलासा देण्यासाठी त्वरित हे आरक्षण सुरू करण्यात यावे, अशी मागणी गिरीश करगुटकर यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:07 12-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow