रत्नागिरी : केंद्रपुरस्कृत नवभारत साक्षरता स्पर्धेचा निकाल जाहीर

Aug 12, 2024 - 11:06
Aug 12, 2024 - 12:02
 0
रत्नागिरी : केंद्रपुरस्कृत नवभारत साक्षरता स्पर्धेचा निकाल जाहीर

रत्नागिरी : केंद्रपुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता अंतर्गत आयोजित विविध जिल्हास्तरीय स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शैक्षणिक वर्षामध्ये नवभारत साक्षर कार्यक्रम सुरु आहे. या अभियानांतर्गत जिल्हा, तालुका, केंद्र, प्रशिक्षण घेऊन असाक्षर यांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानंतर स्वयंसेवक नेमून स्वयंसेवकांमार्फत नवसाक्षरांसाठी साक्षरतेचे वर्ग घेण्यात आले. त्यानंतर नवसाक्षरांचे मूल्यमापन करण्यात आले.

या वर्षभराच्या कार्यक्रमाच्या आधारे जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारच्या स्पर्धा जिल्हा स्तरावर घेण्यात आल्या. या स्पर्धांचे मूल्यमापन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांच्यामार्फत करण्यात आले. तर स्पर्धेचे नियोजन भाग्यश्री हिरवे व इशात सय्यद यांनी केले.

स्पर्धांचा पाचवी गट निकाल पुढीप्रमाणे:- पहिली ते चित्रकला स्पर्धा प्रथम तीर्था सुभाष गिते ( (रत्नागिरी), संगमेश्वर), द्वितीय मिहीर सांडिम तृतिय हिमगौरी तेंडुलकर (दापोली), उत्तेजनार्थ समर्थ दिंडे (गुहागर), शिव शिनगारे (रत्नागिरी), भित्तीपत्रक स्पर्धा प्रथम अर्णव कोळंबे (दापोली), द्वितीय आर्यन केंबळे (चिपळूण), तृतीय वेद पावसे (दापोली), उत्तेजनार्थ रिया काणेकर (दापोली), आर्या आलीम (रत्नागिरी). रांगोळी स्पर्धा प्रथम जान्हवी शेलार (खेड), द्वितीय खुशी तांबे (खेड), तृतिय स्वरा जाधव (खेड), उत्तेजनार्थ विरा आलीम (गुहागर), वेदिका सुतार (राजापूर), घोषवाक्य स्पर्धा :- प्रथम हर्ष कशेळकर (राजापूर), द्वितीय परी ठोंबरे (चिपळूण), तृतिय समीरा ढवळे (खेड), उत्तेजनार्थ गौरांग नामे (लांजा), अनन्या खाके (देवरुख).

सहावी ते आठवी गट : चित्रकला स्पर्धा :- प्रथम अंतरा कदम (दापोली), द्वितीय साहिल पवार (चिपळूण), तृतीय रुद्र झाडगावकर (रत्नागिरी), उत्तेजनार्थ दिक्षा घनपाल (संगमेवर), वरद मेस्त्री (रत्नागिरी).

भित्तीपत्रक स्पर्धा : प्रथम सारा महाजन (रत्नागिरी), द्वितीय रुद्र रेपाळ (चिपळूण), तृतीय वृषभ पिंपळे (चिपळूण), उत्तेजनार्थ मुक्ता बापट (रत्नागिरी), निधी कदम (रत्नागिरी). रांगोळी स्पर्धा: प्रथम स्वरा सागवेकर (खेड), द्वितीय समृद्धी मांडवकर (लांजा), तृतीय आश्विनी कदम (खेड), उत्तेजनार्थ समीक्षा घाग (खेड). घोषवाक्य स्पर्धा : प्रथम श्लेषा होरंबे (रत्नागिरी), द्वितीय श्रेयश सुर्वे (लांजा), तृतीय जागृती गावडे (खेड).

नववी ते दहावी गट: चित्रकला स्पर्धा: - प्रथम आर्या शिगवण (खेड), द्वितीय प्रथमेश शिंदे (रत्नागिरी), तृतीय तनिष्का शिंदे (संगमेश्वर), उत्तेजनार्थ सार्थकी घोसाळकर (चिपळूण), सार्थक पिंपळकर (दापोली). भित्तीपत्रक स्पर्धा प्रथम अष्मी होडे (रत्नागिरी), द्वितीय ईश्वरी सुर्वे (चिपळूण), तृतीय सक्षम वाकडे (चिपळूण), उत्तेजनार्थ निशिता मोरे (चिपळूण), समीक्षा जाधव (खेड), रांगोळी स्पर्धा:- प्रथम साधना निकम (खेड), द्वितीय तन्वी तांबे (खेड), तृतीय सानिया गुजर (खेड), उत्तेजनार्थ अलोक इंगळे (राजापूर). घोषवाक्य स्पर्धा : प्रथम पद्मश्री वैद्य (गुहागर), द्वितीय वेदांज जड्यार (चिपळूण), तृतीय पर्णिक परांजपे (रत्नागिरी), उत्तेजनार्थ तन्वी तांबे (खेड), तन्वी राणे (दापोली) यांनी यश संपादन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 12/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow