राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त देव-घैसास-कीर महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शन

Aug 13, 2024 - 11:38
 0
राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त देव-घैसास-कीर महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शन

त्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात ग्रंथालय विभागाकडून राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून अवांतर वाचनाच्या पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले.

ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा केला जातो. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने आवांतर वाचनाची पुस्तके महाविद्यालयातर्फे ग्रंथप्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालय समन्वयक सौ. सोनाली जोशी यांनी केले.

यावेळी उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, ग्रंथपाल साईप्रसाद पवार, वैभव घाणेकर, वैभव कीर, ऋतुजा भोवड, राखी साळगावकर, गौरी बोटके, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ग्रंथप्रदर्शनास सर्व विद्यार्थ्यांनी यांनी भेट दिली.

 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 13-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow