BCAअभ्यासक्रमासाठी CET न दिलेल्या विद्यार्थ्यांना CET देण्याची सुवर्णसंधी

Jun 22, 2024 - 10:23
 0
BCAअभ्यासक्रमासाठी CET न दिलेल्या विद्यार्थ्यांना CET देण्याची सुवर्णसंधी

रत्नागिरी : बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन  पदवी  ही आजच्या जगात संगणक विज्ञानाचा गाभा आहे. बीसीए हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. ही पदवी ज्यांना संगणक विज्ञान, सॉफ्टवेअर अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, माहिती सुरक्षा आणि नेटवर्किंग तंत्रज्ञानाचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी आहे. पदवी सॉफ्टवेअर सुरक्षेच्या डिझाइन आणि विश्लेषणावर विशेष लक्ष केंद्रित करून सॉफ्टवेअर सिस्टमची रचना, विकास आणि उपयोजन यावर लक्ष केंद्रित करते.  संगणक प्रोग्रामर म्हणून, आपण डेटाबेस आणि वेब सॉफ्टवेअरसह विविध प्रकारचे  सॉफ्टवेअर तयार करू  शकता. या व्यतिरिक्त, करिअर मार्केट अजूनही वाढत आहे, त्यामुळे तुम्ही जगाच्या विविध भागांमध्ये, उदाहरणार्थ, यूएसए, युरोप, यूके आणि ऑस्ट्रेलियामध्ये आयटी आउटसोर्सिंगमध्ये काम करू शकता.

बीसीए पदवीचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर क्षेत्रातील व्यवसायांसाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि क्षमता तसेच संगणक वापरणे हे आहे.बहुतेक क्षेत्रे त्यांच्या फर्मच्या योग्य ऑपरेशनसाठी संगणक आणि तज्ञांवर अवलंबून असल्याने, बीसीए पदवीमध्ये पदवीधरांसाठी संभाव्य संधींची विस्तृत श्रेणी आहे. 

सदर BCA अभ्यासक्रम हा UGC(University Grants Commission) अंतर्गत समाविष्ट होता . फेब्रुवारी २०२४ दरम्यान BCA हा अभ्यासक्रम AICTE(All India Council for Technical Education) ने नियंत्रित केले जाणार असल्याचे जाहीर झाले.  या अनुषंगाने ज्या महाविद्यालयानेAICTE अंतर्गत मंजुरी घेतली आहे अशा महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी राज्य समाविक प्रवेश (CET) अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या BCA MH-CET शिवाय प्रवेश घेता येणार नाही असे स्पष्ट झाले.

सदर CET 18 मार्च 2024 रोजी  CET सेल द्वारे जाहीर करण्यात आली. 

अनेक विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती उशिरा पोहोचल्याने विद्यार्थ्यांना CET देता आली नाही.BCA या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला इच्छुक विद्यार्थी वंचित राहतील की काय अशी भीती सर्व महाविद्यालयांना तसेच विद्यार्थी व पालकांना वाटू लागली  होती. सर्वच महाविद्यालय तथा विद्यापीठ स्तरावरून पुन्हा CET घेण्यासाठी शासनाकडे ई-मेल , पत्र तथा प्रत्यक्ष भेटून मागणी करण्यात आली.

सदर मागणीला अनुसरून राज्य शासनाने विद्यार्थ्यांचा विचार करून ही CET पुन्हा घेण्याचा निर्णय दि. 21 जून 2024 रोजी CET सेल ने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरती http://www.mahacet.org जाहीर केले आहे. तरी सर्व महाविद्यालय, विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांना 29 मे रोजी झालेल्या CET ला उपस्थित राहता आले नाही अशा विद्यार्थ्यांना ही सुवर्णसंधी आहे. CET परीक्षा आणि फॉर्म भरण्याची तारीख लवकरच जाहीर होईल, असे CET सेलने जाहीर केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 22-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow