लाडक्या बहिणींना पुढच्या पाच वर्षात 90 हजार देणार, फक्त एकच अट.. : अजित पवार

Aug 17, 2024 - 15:27
 0
लाडक्या बहिणींना पुढच्या पाच वर्षात 90 हजार देणार, फक्त एकच अट.. : अजित पवार

पुणे : आज पुण्यातील बालेवाडीत आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ होतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रमाला पार पडत आहे.

शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमामध्ये जमलेल्या बहिणींशी संवाद साधताना राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं की, पुढच्या पाच वर्षांमध्ये लाडक्या बहिणींना 90 हजार रूपये देण्याचं काम आम्ही करणार आहे, फक्त पुढच्या पंचवार्षिकला आम्हाला निवडणून द्या, असंही ते म्हणालेत.

आपल्याला सातत्या टीकवायचं आहे. ते तुमच्या हातात आहे. हे सातत्य टिकवतं असताना पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला संधी द्या, पुन्हा आम्हाला पाठवळ द्या, आम्ही तुमच्या खात्यात पुन्हा एकदा 90 हजार रूपये देण्याचं काम करू. आम्ही शब्दांचे पक्के आहोत, आम्ही वेळ मारून नेणारे नाहीत. जे बोलतो ते करतो, असंही अजित पवार (Ajit Pawar) यावेळी बोलताना म्हणाले.

अख्खा महाराष्ट्र लाडक्या बहिणीमय झाला आहे, आमच्या मनात काही वेगळी भावना नव्हती अर्थ संकल्प मांडताना आमची बहीण, महिला सक्षम झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं होतं. विरोधक कारण नसताना टीका करत आहेत. विरोधक फक्त बहिणीकडे लक्ष दिलं असं म्हणतात, मात्र भावाकडेही आम्ही लक्ष दिले आहे. यापुढे कुणीही लाईट भरू नये, कोण तुमची लाईट कट करायला येत तेच बघतो, हे भावासाठी केलं आहे. काहीजण कोर्टात गेले, पण कोर्टात टिकलं नाही, मग काय करायच असं विरोधकांना वाटायला लागलं असा हल्लाबोल अजित पवारांनी (Ajit Pawar) विरोधकांवर केला आहे.

तर या योजनेचे सातत्याने टिकवायचं आहे, त्यासाठी महायुतीला पाठबळ द्या. पुढील पाच वर्षात 90 हजार रुपये मिळणार आहेत लोकसभा निवडणुकीत असच खोटं बोलून नेरेटिव्ह सेट केला गेला. मात्र त्याला तुम्ही बळी पडू नका असं आवाहन देखील यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) केलं आहे.

एक कोटी तीन लाख फॉर्म जमा झाले आहेत.महिलांना सबळ करण्यासाठी ही योजना आणली आहे. आमच्या राजकीय जीवनातला आनंदाचा दिवस आजचा आहे. पुढेही या योजनेत सातत्य रहाणार आहे, पुढील पाच वर्ष या सर्व योजना पुढे चालू ठेवायच्या की नाही हे तुमच्या हातात आहे, त्यासाठी कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळकडे लक्ष द्यावं लागेल. केंद्रात आपल्या विचारांचे सरकार आहे असंही पुढे अजित पवार म्हणाले आहेत.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:56 17-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow