रत्नागिरी : इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे २० ते २९ ऑगस्ट दरम्यान मेळावे

Aug 19, 2024 - 16:57
 0
रत्नागिरी : इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे २० ते २९ ऑगस्ट दरम्यान मेळावे

रत्नागिरी : इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यामध्ये २० ऑगस्ट ते २९ ऑगस्ट या कालावधीत मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या मेळाव्यांचा तपशील असा - रत्नागिरी तालुका - २० ऑगस्ट - डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन हॉल, कुवारबाव, सकाळी १० वाजता, राजापूर - २१ ऑगस्ट - आबासाहेब मराठे महाविद्यालय, राजापूर सकाळी १० वाजता, लांजा - २१ ऑगस्ट - दुपारी २ वाजता - तु. पुं. शेट्ये महाविद्यालय, संगमेश्वर - २२ ऑगस्ट - सकाळी १० वाजता - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, देवरूख, चिपळूण - २३ ऑगस्ट - सकाळी १० वाजता डीबीजे कॉलेज, चिपळूण, गुहागर - २६ ऑगस्ट - सकाळी १० वाजता - न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज, पाटपन्हाळे, दापोली - २८ ऑगस्ट - सकाळी १० वाजता ए. जी. हायस्कूल, दापोली, खेड - २९ ऑगस्ट - सकाळी १० वाजता - बीएड कॉलेज, भरणे, मंडणगड - २९ ऑगस्ट - दुपारी २ वाजता - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मंडणगड.

या मेळाव्यांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक संतोष चिकणे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:26 19-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow