रत्नागिरी : खादी ग्रामोद्योग केंद्रासाठी जागेसह १३ कोटींची तरतूद : पालकमंत्री उदय सामंत

Aug 20, 2024 - 12:07
Aug 20, 2024 - 12:08
 0
रत्नागिरी : खादी ग्रामोद्योग केंद्रासाठी जागेसह १३ कोटींची तरतूद : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे होणाऱ्या राष्ट्रीय हस्तकला व प्रशिक्षण केंद्रासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत १२०० चौ. मीटर जागा उपलब्ध करून दिली आहे तसेच १३ कोटींच्या भरीव निधीचीही तरतूद केल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. पालकमंत्री सामंत यांनी पुणे येथील हस्तकला केंद्राला भेट दिली होती. रत्नागिरीतही अशा स्वरूपाचे देशाचे नावीन्यपूर्ण राष्ट्रीय हस्तकला व प्रशिक्षण केंद्र विकसित करण्याबाबत खादी ग्रामोद्योग मंडळाला सूचना दिली होती. त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची मिरजोळे एमआयडीसीमध्ये मंडळास भूखंड उपलब्ध करून दिला आहे.

सामूहिक सुविधा केंद्रासाठी १३ कोटी निधीची भरीव तरतूदही केली आहे. लवकरच याचा भूमिपूजन समारंभ होणार आहे. या राष्ट्रीय हस्तकला केंद्र व त्यामध्ये प्रशिक्षण घेणे हे पर्यटक आणि विद्यार्थ्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 20/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow