रत्नागिरी : बेकायदा जुगार अड्ड्यावर धाड
रत्नागिरी : शहराच्या जयस्तंभ ते घुडेवठार जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी गुरुवारी दुपारी ३ वा. घाड टाकली. यात २ हजार ६३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गौरव संतोष शिंदे (३२) गुरुवारी सायंकाळी गौरव शिंदे हा जयस्तंभ ते घुडेवठार जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बेकायदेशीर जुगार खेळ चालवताना आढळून आला. शहर पोलिसांनी त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण २ हजार ६३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयिताविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कमल १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 08-06-2024
What's Your Reaction?