रत्नागिरी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या मोहिमेला वेग

Aug 20, 2024 - 12:30
Aug 20, 2024 - 12:35
 0
रत्नागिरी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या मोहिमेला वेग

रत्नागिरी : पावसाने उघडीप दिल्यानंतर रत्नागिरी शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्याच्या मोहिमेला वेग आला आहे. मुख्य रस्त्यावर डांबराने पंचिंग केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २१ रोजी रत्नागिरी दौऱ्यापूर्वी शहरातील रस्ते चकाचक होणार असल्याचे चित्र आहे. खड्डे पंचिंगबरोबरच साफसपाई, दुभाजकावरील झाडी कापणी, काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यांच्या बाजू पट्ट्या भरणे अशा कामांनाही वेग आला आहे.

अतिमुसळधार पावसामुळे रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली होती, यावरून नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. बाढता रोष लक्षात घेऊन नगरपालिकेने खड्डे बुजविण्यास सुरुवात केली. मात्र, पावसामुळे त्यात खंड पडत होता. मात्र, गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली आणि कडकडीत उन पडले. परिणामी, शहरातील रस्ते खड्डे मुक्त करण्याच्या मोहिमेला वेग आला.

डांबरयुक्त साडीने रस्ते भरण्यात येत आहेत. मारुतीमंदिर परिसरातील रस्त्यांची अवस्था विकट होती. ही कामे हाती घेण्यात आल्यामुळे रत्नागिरीकरांना दिलासा मिळणार आहे. याचदरम्यान रत्नागिरी २१ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिदि यांच्यासह दोन उपमुख्यमंत्री रत्नागिरीतील कार्यक्रमासाठी येत आहेत. त्यांच्या स्वागताला रत्नागिरीतील रस्ते गुळगुळीत होणार आहेत. तसेच रस्ते स्वच्छ करण्याचीही मोहीम पालिकेने हाती घेतल्यामुळे ची रंगरंगोटीसह डागडुजीला सुरुवात झाली आहे.

नगरपालिका प्रशासनाकडून सज्जतेचे कामकाज सुरू आहे. परंतु, या सुरू असलेल्या कामाबाबत काही नागरिकांना उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री हे रत्नागिरी दौऱ्यावर येत असल्याची कल्पना असल्यामुळे त्यानिमित्ताने तरी रस्त्यांची डागडुजी, रस्ते चकाचक, दुभाजकांच्या झाडांची साफसफाई अशा अनेक कामांमध्ये प्रशासन कामाला लागल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

नागरिकांना दिलासा
पावसाने उघडीप दिल्यानंतर शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग आला आहे. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा दौरा आहे. एकंदरीत शहर खड्डेमुक्त होणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 PM 20/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow