रत्नागिरी : श्री देव भैरव-काशीविश्वेश्वराच्या पालखीची भेट

Aug 13, 2024 - 11:16
 0
रत्नागिरी : श्री देव भैरव-काशीविश्वेश्वराच्या पालखीची भेट

रत्नागिरी : काय वर्णू ती मी शोभा, आजच्या दिनाची, भेट झाली पाहा हो भैरी शिवाची, या अशा अभंगाच्या तालावर राजीवडा येथील श्रीदेव काशीविश्वेश्वर व मांडवी येथील श्रीदेव भैरवाच्या पालखी भेटीचा सोहळा श्रावण सोमवारी रंगला. ही पालखी भेट पाहण्यासाठी हजारो भक्तगण उपस्थित होते. 

श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी श्रीदेव काशीविश्वेश्वर आणि मांडवी येथील श्रीदेव भैरवाच्या भेटीचा सोहळा रंगतो. यासाठी श्रीदेव भैरवाची पालखी दरवर्षी राजिवडा येथे श्री काशीविश्वेश्वराच्या भेटीसाठी येत असते. विश्वेश्वराच्या घाटीमध्ये त्यांची भेट होते आणि भाविक आनंदोत्सव व गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा गजर केला. श्रावणाच्या पहिल्या सोमवारी दोन्ही मंदिरांमध्ये नामसप्ताहाला प्रारंभ झाला. दुसऱ्या सोमवारी नामसप्ताहाची सांगता झाली. या वेळी दोन्ही देवतांची पालखीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या वेळी अभंग गात भक्तगण तल्लीन होऊन नाचले. श्रीदेव काशीविश्वेश्वराची पालखी मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घातल्या. तिसऱ्या प्रदक्षिणेला श्रीदेव भैरी देवाच्या पालखीभेटीचा सोहळा रंगला. या वेळी अब्दागीर, वीणा यांचीही भेट सुरवातीला रंगली. मांडवी येथील श्रीदेव भैरीची पालखी राजीवड्यात येताना विठ्ठल मंदिर, तेलीआळी नाका, खडपेवठारमार्गे राजीवडा धारेवर येते व तेथील भेटीसाठी मंदिराच्या दिशेने खाली येते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 13/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow