खेड : खवटीतील उत्खननप्रकरणी १ कोटी ३१ लाखांची दंडात्मक कारवाई

Aug 21, 2024 - 10:59
Aug 21, 2024 - 12:05
 0
खेड : खवटीतील उत्खननप्रकरणी १ कोटी ३१ लाखांची दंडात्मक कारवाई

खेड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खवटी सतीचा कोंड येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे. याबाबत ओरड झाल्यानंतर मंडळ अधिकारी यांनी केलेल्या पंचनामान्याप्रमाणे तहसीलदारांनी १ कोटी ३१ लाख २५ हजाराची दंडात्मक कारवाई केली.

राष्ट्रीय महामार्गालगतच्या खवटी सतीचा कोंड येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन करून त्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती तक्रारदार कुसाळकर यांनी दिली होती. मंडळ अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तेथील साठा पाहून ५०५ ब्रास मातीचे उत्खनन झाल्याचा अहवाल तहसीलदारांना दिला. तहसीलदारांनी शासकीय दराने स्वमित्वधन ६०० रुपयाप्रमाणे ५०५ ब्रास व बाजारमूल्य ५००० रुपये प्रती ब्रासप्रमाणे पाचपट दंड म्हणून १ कोटी ३१ लाख २५ हजाराची दंडात्मक कारवाई केली. येथे १०० ब्रासचे उत्खनन करण्याची परवानगी दिल्याचे दिसून येते. मात्र, परवानगीपेक्षा अधिक उत्खनन झाल्यामुळेच दंडात्मक कारवाई केल्याचे लेखी पत्र उत्खनन करणाऱ्यांना देण्यात आले आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 21/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow