रत्नागिरी : सोमेश्वर मंदिरामध्ये श्रावणात बेलरोपांचे वाटप

Aug 21, 2024 - 13:44
 0
रत्नागिरी :  सोमेश्वर मंदिरामध्ये  श्रावणात  बेलरोपांचे वाटप

रत्नागिरी : कोकणात विशेषतः रत्नागिरीत श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या मंदिरात नामसप्ताह आणि एक्का साजरे केले जातात. श्रावण महिन्यात हे भक्तिमय वातावरण असते. भगवान शंकराला बेल हा वृक्ष प्रिय आहे. डॉ. दिलीप नागवेकर यांच्या संकल्पनेतून यावर्षी सोमेश्वर मंदिराच्या एक्का उत्सवानिमित्त जयवंत, रवींद्र आणि डॉ. दिलीप नागवेकर कुटुंबीयांकडून बेलरोपाचे वाटप करण्यात आले. डॉ. नागवेकर यांनी बेलवृक्षाचे माहात्म्य आणि महत्त्व ग्रामस्थांना समजावून सांगितले. त्याचबरोबर सद्यः परिस्थितीत वृक्ष लागवड महत्त्वाची असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक सोमेश्वर मंदिर ट्रस्टचे कार्यवाह मंदार सोहनी यांनी केले. रोपांचे वाटप डॉ. दिलीप नागवेकर, जयवंत नागवेकर, योगेश नागवेकर, नंदकिशोर सुर्वे, मंडळाचे अध्यक्ष उमेश बोरकर, कार्यवाह मंदार सोहनी, खजिनदार किशोर बोरकर, सदस्य दीपक बोरकर, सदस्य विलास गुरव, प्रतिष्ठित ग्रामस्थ सदा मयेकर, सुभाष बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावर्षी या रोपांची लागवड करून ती जगवून पुढच्या वर्षी श्रावण सोमवारी स्वतःच्या झाडाची बिलपत्रे सोमेश्वराला अर्पण करूया, असे आवाहन अध्यक्ष उमेश बोरकर आणि त्यांचे सहकारी यांनी ग्रामस्थांना केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदकिशोर सुर्वे यांनी विशेष परिश्रम केले आहेत. डॉ. नागवेकर यांच्या कुटुंबीयामार्फत २०२२ मध्ये तोणदे, २०२३ मध्ये पोमेंडी आणि यावर्षी सोमेश्वर गावी बेलवृक्षाचे वाटप केले. सोमेश्वर ग्रामस्थांच्या बहुमोल सहकार्यामुळे कार्यक्रम झाला. या वेळी बहुसंख्येने सोमेश्वर ग्रामस्थ उपस्थित होते.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 21/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow