लाडक्या बहि‍णींची रेकॉर्ड ब्रेक गर्दी; ना. सामंतांचे नेटके नियोजन

Aug 21, 2024 - 16:18
 0
लाडक्या बहि‍णींची रेकॉर्ड ब्रेक गर्दी; ना. सामंतांचे नेटके नियोजन

रत्नागिरी : महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार व प्रसार कार्क्रमांतर्गत आज रत्नागिरीत शासनाच्या वतीने एका भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चंपक मैदानात यासाठी अतिविशाल असा मंडप उभारण्यात आला होता. 

या कार्यक्रमाला येण्यासाठी जिल्हाभरातून सुमारे १५०० हून अधिक एसटी बसेस ची व्यवस्था करण्यात आली होत. या कार्यक्रमाला सुमारे ५० हजाराहून अधिक लाभार्थी महिला उपस्थित राहिल्या होत्या. प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने या कार्यक्रमाचे अत्यंत नेटके असे आयोजन केले होते. रत्नागिरीच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या संखेने लाभार्थी महिला उपस्थित राहिल्या होत्या. लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाल्याचा आनंद प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर दिसत होता. सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रत्येक वाक्याला महिलांकडून जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद मिळत होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:47 21-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow