पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेन दौऱ्यावर जाणार

Aug 22, 2024 - 17:09
 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेन दौऱ्यावर जाणार

वी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेन दौऱ्यावर जाणार असून रशिया-युक्रेन युद्धानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पहिलाच युक्रेन दौरा आहे. तब्बल 30 वर्षांनंतर एखादा भारतीय पंतप्रधान युक्रेनला भेट देणार असून नरेंद्र मोदी नेमका काय शांती संदेश देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या मॉस्कोमध्ये झालेल्या भेटीनंतर एका महिन्यानंतर पंतप्रधान मोदींचा युक्रेन दौरा होत आहे.

युक्रेनचे पंतप्रधान झेलन्सकी यांनी नरेंद्र मोदींना युक्रेन भेटीचं निमंत्रण दिलं असून मोदींनीही ते स्वीकारलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा, 1991 मध्ये युक्रेन स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला दौरा असेल. गेल्या महिन्यात राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे चीफ ऑफ स्टाफ आंद्रे येरमाक म्हणाले होते की, युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात पंतप्रधान मोदी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. 2022 च्या युद्धानंतर भारताने रशिया किंवा रशियन अधिकाऱ्यांचा निषेध करण्यास नकार दिला. त्यावेळी पश्चिमेकडील अनेक देशांनी भारताच्या या भूमिकेवर टीका केली होती.

रशिया दौऱ्यावर असताना युक्रेनच्या लहान मुलांच्या हॉस्पिटलवर हल्ला

नरेंद्र मोदी हे रशियाच्या दौऱ्यावर असतानाच रशियांने युक्रेनमधील लहान मुलांच्या रुग्णालयावर हल्ला केला होता. त्यावेळी मोदींनी या घटनेचा निषेधही केला होता. तर युक्रेनचे पंतप्रधान झेलेन्स्की यांनी मोदींच्या दौऱ्यावर टीका केली होती. अमेरिकेनेही मोदींच्या दौऱ्याला विरोध केला होता.

कीवमधील रूग्णालयावर रशियन हल्ल्यावरून मोदींनी रशियावर टीका केली होती. निरपराध मुलांचा मृत्यू वेदनादायक आणि भयंकर असल्याचे मोदींनी पुतीन यांना सांगितले. रशिया आणि युक्रेनने संवाद आणि मुत्सद्देगिरीने आपला संघर्ष सोडवावा या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

युक्रेनने त्यांच्या युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या अर्थव्यवस्थेच्या उभारणीसाठी भारतासह जगभरातून गुंतवणूक मागितली आहे.युक्रेनने त्या देशात गुंतवणूक करण्यासाठी भारतीय कंपन्यांना आमंत्रित केलं आहे.

45 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान पोलंडला जाणार

युक्रेनच्या दौऱ्याआधी 21 ते 22 ऑगस्ट दरम्यान पंतप्रधान मोदी पोलंडला भेट देणार आहेत. 45 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान पोलंडला भेट देणार आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मॉस्कोमध्ये झालेल्या भेटीनंतर एका महिन्यानंतर पंतप्रधान मोदींचा युक्रेन दौरा होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 आणि 22 ऑगस्ट रोजी पोलंडमध्ये असतील, जेथे ते भारतीय समुदायातील लोक आणि येथील व्यावसायिकांशी चर्चा करतील. पंतप्रधान मोदी पोलंडमधील स्मारकांना भेट देणार आहेत ज्यात जामनगर आणि कोल्हापूरचे ऐतिहासिक नाते त्यांच्या मुळाशी आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow