रोहित शर्मा अन् जय शाह टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन सिद्धिविनायकाच्या चरणी

Aug 22, 2024 - 12:08
Aug 22, 2024 - 17:08
 0
रोहित शर्मा अन् जय शाह टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन सिद्धिविनायकाच्या चरणी

भारताच्या एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि बीसीसीआय सचिव जय शाह हे सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी पोहोचले आहेत.

त्याचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. जय शाह आणि रोहितने भारताने जिंकलेली टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफीही सिद्धिविनायकाच्या चरणी नेली आहे. विशेष म्हणजे या ट्रॉफीला पुष्पहार घालून पूजनही करण्यात आले.

29 जून रोजी टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला आणि इतिहासात दुसऱ्यांदा क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये विश्वविजेतेपद पटकावले. त्या ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीनेही टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. दुसऱ्याच दिवशी रवींद्र जडेजानेही या फॉरमॅटला अलविदा केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow